ईतर

पुसद शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर मुदतबाह्य ब्लिचिंग पावडरचा वापर सर्रासपणे; नगर पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर!

पुसद: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर नगर पालिका प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे.हे पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे. या पाण्यातून जंतू संसर्ग होवून साथीचे रोग पसरण्याची भिती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलसुद्धी केंद्रावर पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जाते ते मुद्दत बाह्य ब्लिचिंग पावडरचा सर्रासपणे वापर होत असल्याचे माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी उघड केली असून संबंधित प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असून शहरातील नागरिकाचे जीवन धोक्यात आले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू असून संबंधित प्रशासनातील अधिकारी “हम करे सो कायदा” या प्रवृत्तीने वागत असून शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जलशुध्दीकरण केंद्रावर वापरल्या जाणारे ब्लिींग पावडर हे एक्सपायरी डेट (मुदतबाह्य) वापरल्या जात आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुसद नगर पालिका ही पाणी पुरवठाच्या बाबतीत विदर्भात अव्वल नगर पालिका म्हणुन ओळखळ्या जाते. दररोज स्वच्छ व निर्जतु पाणी पुरवठा करणारी नगर परिषध म्हणुन पुसदचा नावलौकीक आहे. परंतु प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स‌द्या नगर परिषद पुसद पाणी पुरवठा विभागाच्या जलशुध्दीकरण केंद्रावर वापरण्यात येणारे ब्लिचर्चीग पावड ही विक्रम – एसी१००एस२५ किलो हे वापरण्यात येत आहे. परंतु या कंपनीच्या बॅग वरील मुदत एक वर्ष अगोदर म्हणजेच दि,२ जुलै २०२३ रोजी संपलेली आहे. असे असतानांही सदर बिल्चिंग पावडरचा सर्रास वापर केल्या जात आहे. अगोदरच संततधार पावसामुळे नागरीक वैतागले असुन जंतू संसर्ग होऊन साथीचे रोग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच दैनंदिन पिण्याच्या पाण्यात एक्सपायरी डेट (मुदतबाह्य) ब्लिचींग पावडरचा सर्रास वापर होत आहे.

शिवाय शहरात घाणीचे सामाज पसरले आहे. त्यातही मुदत संपलेली ब्लिचींग पावडर यामुळे अतिसार, पोटाचे आजार मलेरीया सारखे विविध आजाराला व रोगराईला नगर पालिका आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर बाबी अधिका-यांना माहित असतांना सुध्दा मुदतबाह्य ब्लिचींग पावडरचा वापर केल्या जात असुन नवीन दराने बिल देण्याचा नगर पालिकेने सपाटा लावला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर व प्रशासनावर कोणाचाही दबाव न राहिल्याने नगर परिषदेच्या विविध विभागात मनमानी कारभार चालु आहे. जलशुध्दीकरण केंद्रावर ३ शिफ्ट मध्ये किमान ३ बेंग पावडर वापरणे गरजेचे असतांना केवळ एकाच बॅगचा वापर होत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या वातावरणात पाण्याचे निर्जतुकरण आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. शिवाय क्लोरीन गॅस व अॅलमचा ही वापर आवश्यकच्या प्रमाणात होताना दिसुन येत नाही
शहरात लिकेज दुरुस्ती साठी एक खड्‌डा खोदण्याच्या कामाचे देयके ७०००/- रु. नगर पालीकेने ठरविले आहे. दिवसाकाठी मनमानी पद्धतीने खड्‌डे लिहून बिल काढण्याचा सपाटा चालु आहे. शिवाय अनावश्यक साहित्य पुरवठा करून घेऊन बिले देण्याचे कामही चालु आहे. १५ लाखाच्या कामाचे बिले ५५ लाखावर गेले आहे. सर्रास अनेक बिलात १०० पटीने वाढ केल्याचे दिसून येत आहे. त्यातही मुदतबाह्य ब्लिचींग पावडर वापरुन नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्यामुळे शहरात नागरीकांना रोगराईची लागण झाल्यास या संपुर्ण प्रकाराला नगर परिषद व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील या कडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close