सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासननिर्णय रद्द करावा – सेवानिवृत्त शिक्षक संघाची मागणी!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अखिल महाराष्ट्र सेवानिवृत्त शिक्षक संघ शाखा वणी यांचे तर्फे महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना वीस हजार रुपये महिना याप्रमाणे मानधन तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयामुळे आपल्या राज्यातील डीएड, बीएड धारक बेरोजगार विदयार्थ्यामध्ये असंतोष वाढलेला आहेत. त्यांचे वर अन्याय होत आहेत. तरी आपण संबधीत शासन निर्णय रद्द करावा व प्राथमिक, माध्यामिक शिक्षकांसाठी पात्र शिक्षकांची लवकरत लवकर नियुक्ती करावी व बेरोजगारी कमी करावी. अशी मागणी वणी तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघ च्या सदस्यांनी मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अंबादास वागदरकर, सचिव विवेक गाडगे, कार्याध्यक्ष अशोक पिंपळशेंडे, उपाध्यक्ष नेताजी मोरे, सुभाष पाचभा॓ई, लक्ष्मण इद्दे, पवन जेणेकर, गुलाब आवारी, प्रभाकर पंडीले, रवि मत्ते, राजुकचवे, मधुकर पळवेकर, जी.बीड.इंगोले, भगत सर, नन्नावरे सर,अरुण राजुरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.



