पुसद:ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन-पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त दीपक परिहार मित्र मंडळाच्या वतीने फुलसिंग नाईक कॉलेज जवळ माहूर टी पॉईंटवर रस्त्याच्या कडेला काही दिवसापूर्वी सुंदर प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु या रस्त्या चे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने नाली बांधकामाच्या नावावर किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चक्क प्रवासी निवारा चोडुन नेल्याची तक्रार भाजपाचे शहराध्यक्ष दीपक परिहार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडे करण्यात आली होती त्या तक्रारीवर वारंवार अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्यासाठी संपर्क साधण्यात आला असता त्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने दि.९ मे रोजी शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व कंत्राटदारांचा निषेध करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच त्या जागेवरील प्रवासी शोधून तत्काळ उभा करावा अन्यथा नमो ग्रुपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद प्रशासनातील निगर गट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून निषेधही करण्यात आला आहे.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष दीपक परिहार कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नमो ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते