ईतर

‘निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची त्रिसदस्य समितीमार्फत सखोल चौकशी करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा-दिपकसिंह परिहार शहराध्यक्ष भाजपा 

पुसद:शहरातील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. परंतु, या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर कामाची त्रिसदस्य समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष दिपकसिंह परीहार यांनी नपचे मुख्यधिकारी व संबंधित वरिष्ठांकडे निवेदनातून केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 सध्या पुसद नगर परिषदेच्या हद्दीत विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी खर्च केला जात आहे. त्यातून शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे.शहरात नाईक चौक ते मुखरे चौक तसेच नाईक चौक ते अण्णाभाऊ साठे पुतळ्या पर्यंत तसेच शिंदे हॉस्पिटल ते चोंढीकर यांच्या घरापर्यंत व गांधी चौक ते सुभाष चौक या मुख्य रस्त्यांचे कामे सुरू आहेत तर काही रस्त्यांचे काम केले आहे हे हे कामे मंजूरात आराखड्या (ईस्टीमेट) झाली नसुन करण्यात आले नाही या रस्त्याच्या कामेकन्स्ट्रक्शन कंपनीला असून सदर रस्त्याचे बरेच काम पूर्णत्वाला आले असून बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर काम सुरू असतानाच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात उखडल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या कामात गैरप्रकार होत असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यांची दयनीय दुरवस्था झाली असून टक्केवारीच्या ग्राहणामुळे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने विकासकामांसाठी शासन लाखो रुपये खर्च करत असताना रस्ता उखडला जात आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा घामाचा पैसा पाण्यात जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे कंत्राटदार भ्रष्टाचार करण्यासाठी हापहाफले आहे या रस्त्याच्या बांधकामाची १४ दिवसाच्या आत त्रिसदस्य समिती नेमून सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार याचा परवाना रद्द करुन या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष दिपकसिंह परीहार यांनी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन केली आहे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष दिपकसिंह परिहार, राजेंद्र जगताप, संतोष मुकेश, हरिश चौधरी, विक्रांत जिल्हेवार, महेश काळे, संतोष आर्य,सुरज कुरील, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close