ईतर

काळी दौ येथे विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमॅनचा मृत्यू!

काळी (दौ)/प्रतिनिधी (संदीप ढगे):महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमॅनच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी चार वाजता च्या सुमारास घडली विठ्ठल सिताराम अढाव (वय २५) असे मृतक खाजगी लाईनमॅन नाव आहे.

खाजगी लाईनमन विठ्ठल अढाव हा काळी दौ येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रांगणातील विजेचे खांबावर काम करत होता चार वाजताच्या सुमारास अचानक विजप्रवाह सुरू झाल्यानं त्याला विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, घटनेची माहिती कळताच काळी दौलत येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारला व समाधानकारक उत्तर ना मिळाल्याने संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता काकडे यांना धक्काबुक्की केली,

या घटनेची माहिती कळताच दुरक्षेत्र काळी दौलत पोलीस चौकीचे एपीआय बालाजी शेंगेपल्लु पल्लू यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले परिस्थिती चिघळतांना पाहुण दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले व उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर, ठाणेदार राजेश राठोड यांनी घटनास्थळ गाठले व परीस्थितीवर नियंत्रण मिळविले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close