दौऱ्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयातून शाखा अभियंता उपअभियंत्याची ‘दांडी’यात्रा; या अभियंता कर्मचारी अधिकाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी!

पुसद :येथील जिल्हा परिषद बांधकाम उविभागच्या शासकीय कार्यालयातील शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता उपअभियंता हे दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयातुन नेहमी ‘दांडी’यात्रा काढत असुन या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय मुख्यालयाची ॲलर्जी असल्याने असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु राजकीय अनास्थेमुळे या कार्यालयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत झेप न्यूजच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत.जि.प.बांधकाम उपविभाग पुसद कार्यालयात जवळपास १७ते१८ एकूण कार्यालयीन कर्मचारी आहेत तर उपअभियंता यांच्याकडे जि.प.बंधकाम उपविभाग महागाव तालुक्याचा ही प्रभार आहे पण अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर हजर रहावे, अशा सूचना असून सुद्धा ते हे कर्मचारी हप्त्यातील सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत कारकून चतुर्थश्रेणी कर्मचारी सोडले तर बाकीचे अभियंता अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर राहत नाही हे मात्र शोकांतिक आहे. कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी कार्यालयाच्या म्हणजे सकाळी १०:०० वा. येण्याची वेळ तर कार्यालय ५ :००वा. बंद होण्याची वेळ असताना देखील हे सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारी १२:००ते१:०० वाजण्याच्या सुमारास आले तर येतात तर काही अभियंता व अधिकारी दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयात दिसतच नाहीत.या अभियंत्यांनी शहरात इतरत्र कार्यालय सोडून आपले बस्तान बसविलेले आहे तेथेच संबंधित कंत्राटदारांना बोलावून आपले उखळ पांढरे करून घेतात व स्वाक्षऱ्या करतात तर (एमबी) (सीसी) सुद्धा कार्यालयात जमा करत नाहीत व बाहेरच्या बाहेर सह्या केल्या जातात त्यामुळे या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कामावर न येण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसापासून वाढले आहे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातून येणाऱे नागरिक आपल्या समस्या कोणत्या अधिकाऱ्याजवळ मांडाव्या हे सुद्धा कळत नाही या कार्यालयात अधिकारी हजर राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना किंवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र या कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात. तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना ३० ते ४० कि.मी. अंतरावरुन पैसे खर्चून या कार्यालयात यावे लागते. मात्र अधिकारी नसल्याने त्यांना नाहक खर्च व त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला तर उत्तर देत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे कामे होत नाहीत काही अधिकारी अभियंते कार्यालयात असेच तर लगेच गायब होताना दिसतात. या कार्यालयाच्या भरोशावर ग्रामीण भागाच्या रस्ते विकासाची जबाबदारी आहे मात्र कार्यालयाचे अधिकारी अभियंत्याच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याचे कामे होताना वेळ लागत आहे. हे कामे फक्त कागदावरच केली जात आहे. तर या कार्यालयावर कोणत्याही राजकारण्याचे अंकुश राहिले नसल्यामुळे हे भ्रष्टाचारी अभियंते अधिकारी दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयात हजर न राहण्याचा शिरजोरपणा दाखवत आहेत.या कार्यालयातील दांडीबहाद्दर कर्मचारी अभियंता उपअभियंता कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे तसेच ते जनतेसाठी वेळेवर हजर राहत नसल्यामुळे त्यांचे स्वाक्षरी मस्टर ऐवजी त्यांच्यासाठी संबंधित विभागाने बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात यावी तसेच दांडीबहाद्दर व अभियंता कर्मचारी अधिकारी यांचा पंचनामा करून जे अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



