पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हेगडी येथील विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणात विवाहितेच्या वडिलांकडून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, याप्रकरणी २०जुलै रोजी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मृतकांचे वडील जनार्धन वामन डाखोरे रा. मोहदरी ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुसद तालुक्यातील हेगडी येथील अमोल मारोती काष्टे याच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाहित महिला ज्योती हिचा विवाह झाला होता विवाह नंतर तिला दोन अपत्ये सुद्धा झाले परंतु विवाहितेचा पती वारंवार दारू पिऊन विवाहितेचा छळ करीत होता अशी विवाहितेने वडिलाला माहिती सुद्धा दिली होती घटनेच्या दिवशी म्हणजे १८ जुलै२०२४ रोजी आरोपी अमोल हा दारू पिऊन कुऱ्हाड घेऊन विवाहितेच्या मागे लागल्यामुळे या विवाहितेने माझा जीव धोक्यात असल्याची माहिती वडिलांना भ्रमणध्वनीवर कळवली होती परंतु दुसऱ्या दिवशीच पतीच्या जाचाला कंटाळून टिन पत्राच्या घराला साडीच्या साह्टियाने आत्महत्या केली त्यावेळी लगेच अमोलने सासर्याला तुमची मुलगी बेशुद्ध असल्याचे कळविले व तिला रुग्णालयात दाखल केले यावेळी विवाहितेच्या वडिलांनी तात्काळ मुलीचे सासर गाठले त्यावेळी परंतु तोपर्यंत विवाहितेचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह वडीलाच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी या विवाहितेचे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात तिच्या माहेरी मोहदरी येथे पार पडला त्यावेळी मयत विवाह तिचे वडील यांनी तात्काळ पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी पती व त्याच्या परिवाराविरुद्ध फिर्याद दाखल केली ज्योती अमोल काष्टे हिने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने आरोपी पतीसह त्याच्या परिवाराला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.