ईतर
काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्य विरुद्ध पुसद भाजपा महिला मोर्चाचा यलगार!

पुसद : येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस खासदार धीरज शाहू यांच्या विरुद्ध यलगार व निषेध नोदवत छत्रपति शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले,आमदार ॲड.नीलयभाऊ नाईक, जिल्हाध्यक्ष महादेव सूपारे, सौ. शिवणी गुगलिया जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस विरुद्ध निषेध आंदोलन करण्याचा आले, काँग्रेस खासदार धीरज शाहू यांनी बेकायदेशीरपणे भ्रष्टाचारीमार्गातून जमावलेले ३०० कोटी रुपये ईडीने जप्त केले त्या भ्रष्टाचारी काँग्रेस व खासदार यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करत त्यांचा पुतळयाला चपला मारत पुतळा जाळण्यात आला या वेळी अनेक घोषणा हि देण्यात आल्या,या वेळी सर्व भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या, महिला आघाडी, व सर्व आघाडीच्या सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी नेते मंडळी उपस्तित होते,



