नागरिकांच्या सतर्कतेने टळला महिला एसटी बस वाहकाच्या आत्महत्येचा प्रयत्न!
पुसद एसटी बस स्थानकाच्या आवारातील घटना..

पुसद:शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बसस्थानक परिसरात एका महीला एसटी बस वाहकाने बसस्थानकाच्या आवारातील वृक्षावर चढुन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका ऑटो चालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धावून जात त्या महिला बस वाहकला पकडले ऑटो चालकासह पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या महिला बस वाहकाच्या आत्महत्येचा प्रयत्न टळला. ही घटना आज गुरुवार दि.७ रोजी घडली आहे.सदर घटनेची माहिती पोलीसांना मीळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे हे घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे बस वाहक महिलेचा जीव वाचला मोठा अनर्थ टाळला.
या महिला बस वाहकांचे नाव सविता बाळकृष्ण ससाणे वय ३५ वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एसटी बस स्थानकाच्या आवारात एका महिला बस वाहकाने वृक्षावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा अनर्थ नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला याचे कारण स्पष्ट झाले असून दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला वाहकावर एका शाळकरी मुलीने मारहाण केल्याचा आरोप होता. या संदर्भात शहर पोलीस स्टेशन येथे या महिला बस वाहकावर पोलिसांनी एनसी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित महिलेने पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या कारणामुळे खचुन जाऊन मानसिक तणावामुळे तिने हे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले असावे परंतु नागरिकाच्या व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली या घटनेमुळे परिसरात काहीकाळ खळबळ उडाली होती. पोलिसांकडून महिलेची समुपदेशन करून तिला पुढील उपचारासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पुसद येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.