संपत्तीपेक्षा संतती महत्वाची! कवडीपूर तांडा येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकांनी केले आवाहन!

पुसद : संपत्ती जमविण्याच्या नादात संततीकडे दूर्लक्ष होण्यामुळे जीवनभर जमवलेली संपत्ती क्षणाधार्तात संपुष्टात येऊ शकते त्यामुळे संततीला योग्य संस्कार व शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी असल्याने संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या असे मत सामाजिक कार्यकर्ते दूर्गादास चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते कवडीपूर तांडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी(ता.१५) ७८ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून गावचे नायक सखाराम चव्हाण,बळीराम राठोड,संजय पाटील,ग्राम पंचायत सदस्य संतोष पवार,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर,रामू आडे,सेवानिवृत्त शिक्षक मधुकर पवार,विनोद कारभारी, सुभाष राठोड, रमेश जाधव,बाळू गाभणे, संजय टेलर, प्रवीण राठोड, प्रदीप चव्हाण, युवराज आडे, रवी राठोड, सुभाष जाधव ,माजी विद्यार्थी व हैदराबाद येथील संगणक अभियंता देवानंद राठोड, मुंबई येथील संगणक अभियंता सौरभ गायकवाड, उमेश जाधव, प्रवीण जाधव, संतोष पद्मे, सुनील चव्हाण,राजेश जाधव, विठ्ठल राठोड, उत्तम जाधव, वसंता आडे, संजय पवार, निशांत राठोड,गणेश पवार, उमेश राठोड ,मांगीलाल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शा.व्य.समितीचे अध्यक्ष अभय पवार यांचे वतीने गावचे नायक सखाराम चव्हाण यांनी ध्वजारोहण केले.
यानंतर शाळेची कॅप्टन चंचल राठोड हिचेसह लक्ष्मी राठोड, नेहा राठोड ,प्रतीक्षा जाधव, नंदनी राठोड, चंचल जाधव व संचाने देशभक्तीपर गितांचे गायन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तालंगकर यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी पाल्यांना नियमित उपस्थित ठेवण्याबरोबरच शासनाकडून शाळेला मिळणार्या तोकड्या निधीमुळे भौतिक सुविधांसाठी लोकसहभाग देण्याचे आवाहन केले.यावेळी मधुकर पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्रीकांत चव्हाण यांनी केले.उपस्थितांचे आभार शशिकांत जामगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका संध्या बेद्रे, करुणा काळे, रंजना कोटगीरवार, मनीषा काण्णव, सीमा येरावार, अंगणवाडी सेविका शोभा चव्हाण, सुनीता पवार, अंगणवाडी मदतनीस निशा राठोड, बेबीबाई देशमाने, शालेय पोषण आहार स्वयंपाकी बेबीबाई जाधव,सुंदलबाई चव्हाण, शोभा चौधरी व विद्यार्थी मंडळांने पुढाकार घेतला.