चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस पलटी ;साह प्रवासी जखमी

पुसद : एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटुन वालतुर तांबडे गावाजवळील पुलाजवळील रस्त्यावर एसटी बस पलटी होऊन विद्युत खांबाला लागली या अपघातात ६ प्रवासी कीरकोळ जखमी झाले आसल्याची घटना घडली आहे. हा अपघात दुचाकीला साईट देताना घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर एसटी बसच्या पुढील व मागिल काचा फोडुन इतर प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला ही घटना बुधवारी सकाळी ७.०० वाजता घडली आहे.
याबाबत झेप न्यूज ला सुत्रांनी दिलेली माहिती अशी की पुसद डेपोची बस बस क्रमांक एमएच ४०,एन ८९३२ हि दि.२० मे २०२५ रोजीच्या रात्री पारध येथे मुक्कामी होती आज सकाळी पारध या गावातील १६ प्रवासी घेऊन पुसद आगारात येत असताना अशातच ही बस वालतुर तांबडे गावाजवळील उतारावरील रस्त्यावर गाडी आल्यावर एका लहान वळणावरील पुलाजवळ दुचाकीला साईट देताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने गाडी बाजुच्या गटारात जाऊन पलटी झाली व विद्युत खांबाला लागली या अपघातात १६ पैकी ६प्रवासी कीरकोळ जखमी झाले होते.हा अपघात झाल्याची माहिती पुसद आगाराला देण्यात आली.
त्यावेळी प्रभारी आगार प्रमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर जखमी प्रवाशांना पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी सांगितली आहे.गेल्या दोन वर्षात वालतुर तांबडे ते पारध या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करण्याकरिता मोठी कसरत करावी लागते.या अपघातात बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगितले जात आहे.