दुय्यम निबंधक कार्यालयाचा अजब कारभार; मयत व्यक्तीला जिवंत दाखवून जमीन विक्रीचा प्रकार उघडकीस

पुसद: येथे मयत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवून जमीन खरेदीचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये उघडकीस आला.तालुक्यातील मौजे वाघजाळी शेत शिवारातील जमिनीचा मालक मयत झाला असताना तो जिवंत आहे, असे दाखवून दुसरा व्यक्ती त्याच नावाने उभा करून जमीन खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. खरेदीदारासह विक्री करणार्या आणि साक्ष राहणार्या सात जणांवर पुसद शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील मयत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवून जमीन विक्रीचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये उघडकीस आला. तालुक्यातील वाघजळी येथे वैद्यनाथ चिनकू परदेशी यांच्या नावाने शेत जमीन असून त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.याचा फायदा घेत सात जणांनी संगणमत करून येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि.२९ जुलै २०२४ रोजी वाघजळी येथील भूमापन क्रमांक ६२ मधील ३ हेक्टर ०८ आर शेत जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून त्या बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदी करून घेतली होती त्या प्रकरणा २९जुलै २०२४ रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती पोलिसाच्या आठ महिन्यांच्या चौकशी नंतर संबंधित सात जणांनी संगणमत करून मयत असलेल्या वैद्यनाथ परदेशी यांची बनावट कागदपत्रे तयार करून जिवंत दाखवून यात विशेष करून त्यांच्या नावाने खोटे आधार कार्ड बनविण्यात आले होते.त्यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला विक्रीदार म्हणून उभे करून तालुक्यातील मौजे वाघजाळी येथील शेत जमिनीची खोटी खरेदी आर्थिक लाभासाठी नावावर करून घेतली.बनावट खरेदी विक्रीचा व्यवहार उघडकीस आल्याने व मय्यताला जिवंत दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे. फिर्यादी फत्तु सिताराम पवार वय ७५ वर्ष रा.वाघजळी यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारी वरुन भीमराव रामधन जाधव वय (६६) आशा भीमराव जाधव वय (६०) रा.वाघजळी, प्रीती गणेश जाधव (३०)रा. मांजर जवळ, सविता किशोर चव्हाण वय (३५) रा.लोहरा खुर्द व माधव नामदेव कांबळे(५५) या सात जनाविरोधात दि.१९ मार्च २०२५ रोजीच्या दुपारी ३.५७ वाजता विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे शहरात बनावट आधार कार्ड बनविण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. यापूर्वी सुद्धा या कार्यालयात अशा घटना घडल्या होत्या त्यामुळे घटनाकडे जिल्हा निबंधक कार्यालयाने लखले लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.



