आ.इंद्रनील नाईक मंत्रिमंडळातील माझे सहकारी म्हणून पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा -महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे वक्तव्य
अभिष्टचिंतनाच्या सोहळ्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम थाटात

पुसद :विधिमंडळाचे सदस्य न म्हणता मंत्रिमंडळातील माझे सहकारी म्हणून इंद्रनील नाईकांच्या पुढ होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार असल्याचे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री तथा कार्यक्रमाचे अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले होते. येथील कारला रोडच्या भव्य प्रांगणामध्ये दि.२७ जानेवारी २०२४ रोजी आमदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त व अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या थाटाच्या कार्यक्रमाला असंख्य समुदाय मिसळला होता.
आमदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोहिनी नाईक व इंद्रनील नाईक मित्र परिवाराकडून अभिनव उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात प्रास्ताविक सदबाराव मोहटे यांनी केले होते. कार्यक्रमांमध्ये महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणल्या कि, माझा माझ्याच मतदार संघात कार्यक्रम असताना तो कार्यक्रम रद्द करून पुसद येथील अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो, त्याचे कारण म्हणजे नाईक परिवारासोबत असलेले जिव्हाळ्याचे व लहानपणापासूनचे माझे नाते आहे.नाईक घराणे हे पिढ्यान पिढी नाते जोपासणारा परिवार आहे.कार्यक्रमात असंख्य जनसमुदाय उसळल्याने नाईक परिवारासोबत मतदार संघातील जनता कायम राहत असल्याचे दिसून आल्याचे प्रतिपादन केले होते.आमच्या सरकारच्या कार्यक्रमांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.ज्यामध्ये बचत गटांना स्मार्टफोन देण्याचा,जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटपाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.आमच्या दोन्ही विधिमंडळात लाडके आमदार म्हणून इंद्रनील नाईकाकडे पाहिले जाते.त्यांना आता मंत्री पदावर पहावयाचे आहे.इंद्रनील नाईक यांच्या प्रत्येक निवेदनाची दखल अजित पवार घेऊन त्यांचे निवेदन मार्गी लावतात.अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमांमध्ये दोनशे महिला बचत गटांना गृहनिर्माण आर्थिक सक्षम करण्यासाठी आटा चक्की मसाला कांडण यंत्राचे वाटप करण्यात आले.दोन हजार जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा वर्षाखालील विद्यार्थ्यांना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी प्रत्येकी अडीचशे रुपये प्रमाणे प्रोत्साहन निधी भरून खाते उघडण्यात आले व त्या पासबुकचे कार्यक्रमात वितरण करण्यात आले.शंभर गरजू विधवा महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.आमदार इंद्रनील नाईक यांच्या वारसा अखंड जनसेवेचा या कार्यक्रमात कार्यपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा देखील थाटात पार पडला होता. थाटात पार पडलेल्या सोहळ्याला नाईक परिवारातील माजी मंत्री मनोहर नाईक,माजी नगरपरिषद अध्यक्षा अनिता नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब कामारकर (पाटील), आमदार राजू नवघरे,आमदार नामदेव ससाने,विधानपरिषद सदस्य राजेश राठोड,माजी विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजणी, चंद्रकांत ठाकरे,विवेक देशमुख, यवतमाळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष सुनयना यवतकर,पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद,जिल्हा परिषद वाशिम चे माजी सभापती जयसिंग राठोड,कारंजाच्या माजी नगराध्यक्ष दत्तराव डहाके,पोहरादेवी संस्थानचे जितेंद्र महाराज,शेखर महाराज, सुनील महाराज,राजू उंबरकर, तारीक लोखंडवाला,अशोक मंगरूळकर,डॉ.राजेश राठोड, डॉ.टि.सी.राठोड,क्रांती राऊत (धोटे),राजू गुल्हाने,दीपक आसेगावकर,निधी भुतडा,कै. शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष विजयराव चव्हाण,जैनूल सिद्दीकी,रंजन वानखेडे, दिलीप जाधव आदी प्रामुख्याने व मोठ्या संख्येने उपस्थित होते



