ईतर

निसर्ग कोपला! पुसद तालुक्याला अवकाळीचा तडाखा,विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाधार पावसाने पिकांची धुळधाण, शेतकऱ्यांचा आक्रोश..

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीच बोलण्यास तयार नाही.

पुसद:गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडील उन्हाळा चढत्या भाजणीने तीव्र होत आहे. तालुक्यातला२८ एप्रिलच्या रात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाधार पाऊस कोसळला.त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली. उन्हाळी पिकांसह केळी आदी फळबागांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले.

निंबी पार्डी परिसरात एका महिलेच्या डोक्यात मीठ पडली तर बकरीचे पिल्लू ठार झाले शिवराम शेटे संजय फुले यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.

अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली. उन्हाळी पिकांसह केळी टरबूज ज्वारी फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये पार्डी शेत शिवारातील शेतकरी विकी धडकर यांच्या सहाय्यक कर व अमोल धडकर यांच्या तीन एकर काढणीसाठी आलेल्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दोन-तीन दिवसापासून दररोज रात्री एक ते तीन दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शहरात अनेक नगरात व गावात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तर निंबी पार्डी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. काही काळ रस्ता बंद झाला होता उन्मळून पडलेल्या झाडामुळे काही ठिकाणी विजेचे तारा तुटल्याने बहुतांश भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. सुदैवाने या अवकाळी पावसाने कुठेही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांची प्रचंड दाणादाण उडाली.अवकाळी पावसाने पिकांची पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

पावसाने शेतीची दाणादाण केली असल्याने शेतकरी निःशब्द झाला आहे. शेतकरी आस्मानी संकटात असतानाच निवडणुकीच्या प्रचारासाठी गावनं गाव ते गल्ली गल्ली फिरणाऱ्या  स्थानिक लोकप्रतिनिधींने मात्र मौन पाळले आहे. अवकाळीने नुकसान झाले तरीही शासकीय मदत मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी मात्र कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरीता कोणीही पुढे न आल्याने संकटातल्या शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपाईबाबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close