भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार-भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.आरती फुपाटे यांची ग्वाही!
पुसद नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार-नितीन भुतडा!

पुसद : नुकतीच भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची यादी समोर आली. यामध्ये पुसद जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांनी आदिवासी समाजातल्या एका उच्चशिक्षित महिलेवर जिल्ह्यांतील जबाबदारी दिली आहे.
भाजपच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्यां माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरतीताई हरीभाऊ फुपाटे यांची नियुक्ती करण्यात आली.स्थानिक पातळीवर त्यांना मतदारसंघाची चांगली जाण आसल्याने आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहोत. जिल्ह्यात मोठी विकास कामे आणण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबवली जातील असा स्पष्ट विश्वास भारतीय जनता पार्टीचे पुसद जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.आरतीताई फुपाटे यांनी व्यक्त केला.
पुसद येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याकार्यालयात दि१७मे२०२५रोजी जिल्हाध्यक्षपदाचा पदग्रहण समारंभ सोहळा आयोजित केला होता यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा पदग्रहण समारंभ सोहळा भाजप पक्षाचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळते जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्याकडून पदभार स्विकारला.
याप्रसंगी पत्रकार परिषदेला भाजपा समन्वयक नितीन भूतडा, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीसन वानखेडे माजी आ.नामदेवराव ससाने, माजी आ.विजय खडसे, माधवराव वैद्य, विनोद जिल्हेवार, अनिरुध्द पाटील चोंढीकर, ॲड. आदित्य माने, दीपक परिहार, रवि ग्यानचंदानी, माजी जि.प.सदस्य ॲड.अमेय नाईक, मंडळ अध्यक्ष निलेश पेन्शनवार, अजय दुबे, डॉ.हरिभाऊ फुपाटे अगदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक महेश काळेश्वरकर यांनी केले. भाजपाने बूथ समिती गठीत करुन मंडळ अध्यक्ष नेमले. त्यानंतर जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणुन डॉ. आरतीताई फुपाटे यांची निवड करुन पक्षाने महिलेला संधी दिली. त्यांच्या कार्यकाळात पक्ष निश्चितपणे वाढेल असे महेश काळेश्वरकर म्हणाले. माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी अध्यक्षीय कार्यकाळात सर्वांनी सहकार्य केले. पक्ष वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केल्याचे म्हणाले.भारतीय जनता पक्षात खऱ्या अथनि लोकशाही जीवंत आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम पक्ष करतो. सबका साथ सबका विकास हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून एका उच्च विद्याविभूषित महिलेची भाजपाने जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड केली. राज्याचे नेतृत्व नेहमी अनुसुचित जमाती महिलांचा आदर करते. १५ टक्के या मधुन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपा पूर्ण ताकदीनिशी उतरणार असुन पुसद विभागात नंबर एकचा भाजपा पक्ष होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. डॉ. आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे भाजपा क्रमांक एकचा पक्ष होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष सोबत आले किंवा नाही तरीही फक्त पुसद नगर परीषदेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल असा विश्वास नितीन भुतडा यांनी व्यक्त केला.यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्षा म्हणाल्या की,भाजप पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सर्वोतोपरी न्याय देण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष संघटना मजबूत करुन तळागाळात पोहोचवणार आहे तसेच ऑपरेश सिंदुर फत्ते करणाऱ्या भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली,व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमीत्य विविध उपक्रम जिल्हाभर राबविणार असल्याचे देखील डॉ. सौ. आरतीताई फुपाटे यांनी आवर्जुन सांगीतले.
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पाकीस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांवर भ्याड हल्ला करून धर्माच्या आधारे २७ पर्यटकांचा जिव घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु या कृतीला चोख उत्तर म्हणून भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदुर राबवून पाकिस्तान मधील अनेक दहशतवादी तळांना उध्वस्त करून दहशतवादी संघटनांना सोबतच यांना शरण देणाऱ्या पाकीस्तानला भारत माता की जय म्हणत सडेतोड प्रतिउत्तर देत त्यांना जेरीस आणले. या कारवाईतुन देशहितासाठी जात, पात, पंथ व पक्ष विसरून केवळ आणि केवळ आणि केवळ भारतीय म्हणून आम्ही सर्व एकत्रपणे देशहितासाठी कायम तत्पर आहोत हे संदेश जगाला दिले. याच पार्श्वभुमीवर देशभक्तीची भावना जाज्वल्य करण्याच्या हेतुने दि. १९ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता यशवंत रंगमंदीर येथून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून पुसद शहर व ग्रामीणच्या सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, या रॅलीमध्ये मोठ्या निष्पाप भारतीय नागरिकांवर भ्याड हल्ला करून धर्माच्या आधारे २७ पर्यटकांचा जिव घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु या कृतीला चोख उत्तर म्हणून भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदुर राबवून पाकिस्तान मधील अनेक दहशतवादी तळांना उध्वस्त करून दहशतवादी संघटनांना सोबतच यांना शरण देणाऱ्या पाकीस्तानला भारत माता की जय म्हणत सडेतोड प्रतिउत्तर देत त्यांना जेरीस आणले. या कारवाईतुन देशहितासाठी जात, पात, पंथ व पक्ष विसरून केवळ आणि केवळ आणि केवळ भारतीय म्हणून आम्ही सर्व एकत्रपणे देशहितासाठी कायम तत्पर आहोत हे संदेश जगाला दिले. याच पार्श्वभुमीवर देशभक्तीची भावना जाज्वल्य करण्याच्या हेतुने दिनांक १९.०५.२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता यशवंत रंगमंदीर येथून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे ही रॅली कोणत्याही एका पक्षाची नसुन संपूर्ण भारतियांची आहे त्यामुळे पुसद शहर व ग्रामीणच्या सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करावे असे आवाहन करण्यात आले.तसेच संघर्षाचा ईतीहास लाभलेल्या भारतभुमीसाठी जिवन समर्पीत करणाऱ्या विरंगणामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रगण्य आसल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मउत्सव म्हणजे ३०० वी जयंती उत्सवानिमित्त यांच्या जिवनावरील चित्ररथ व शोभायात्रा आयोजीत करून त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात येणार आहे असल्याची माहिती देण्यात आली असून. याप्रसंगी सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, सर्व प्रकोष्ठ प्रमुख व सहा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.मात्र भाजपच्या माजी आमदारांसह व जिल्हाध्यक्ष पदाच्या रेस मध्ये असलेले भाजपचे काही पदाधिकारी या पदग्रहण समारंभ सोहळ्याला उपस्थित राहीले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पुसद जिल्हाध्यपदाच्या शर्यतीत पक्षातील अनेक मात्तबार मैदान उतरले होते. एकीकडे दोन दिग्गज नेते इच्छुक असताना स्थानिकसाठी भाजपने मोठी रणनीती आखली असून अंतर्गत वाद टाळण्यासाठी भाजपने संधी दिली ती डॉ. आरतीताई फुपाटे यांच्या नावावर शिकामोर्तब केला त्यामुळे येणाऱ्या काळात पुसद भाजापात दोन गटात खुर्चीसाठी वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापैकी एक गट नाराज झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश राजे, प्रास्ताविक रवि ग्यानचंदानी तर आभार प्रदर्शन महेश काळेश्वरकर यांनी केले.