ईतर

बिबट्याचा त्याच राहुटीवर पुन्हा दुसऱ्यांदा हल्ला  म्हशीचे वघारु केले ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

पुसद: तालुका अंतर्गत येत असलेल्या गणेशपुर शेत शिवारात २२ सप्टेंबरच्या रात्री गोठ्यात बांधलेल्या वासावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे. तर दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबर च्या रात्री ९:०० वाजण्याच्या  सुमारास त्याच राहुटीवर  पुन्हा त्या बिबट्याने शेतातील गोठ्यात बांधून असलेली म्हशीच्या वघारीवर हल्ला करून ठार मारले आहे.

 

सविस्तर वृत असे की पार्ङी येथील सुभाष तुकाराम वांझाळकर.यांचे गणेशपुर शिवारात शेत आहे त्यांचे जनावरे शेतातील गोठ्यात बांधलेली होती महालक्ष्मी पुजन असल्यामुळे रात्री कुणी शेतात गेली नाही. सकाळी सुभाष वांझाळकर. हे म्हशीचे दूध काढण्याकरिता शेतात गेले असता त्यांना हे वासरू ठार केल्याचे दिसले.वासरू कशाने मारले त्याचा शोध घेतला असता शेतात वाघाची पंजे दिसून आले.त्यामुळे हे वासरू बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निर्देशनात आले. त्यांनी तत्काळ फोन करून वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे वनपाल पी.बी. ताटे.साहेब यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर केला.२४ सप्टेंबर च्या रात्री पिंटू वांझाळकर हे शेतात जागल करीत होते ९:०० वाजण्याच्या सुमारास  बिबट्याने शेतातल्या गोठ्यात बांधून असलेल्या म्हशीच्या वघारीवर हल्ला करुन ठार केले. ही सर्व घटना पिंटू वांझाळकर यांनी पहिली व फोन करून गावातील नागरिकांना व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली गावातील ५० नागरिक घटनास्थळावर दाखल झाले तसेच वन विभागाचे उपवनसंरक्षक स्वामी साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत साहेब. फिरते पथकातील वनपरिक्षेत्राधिकारी निमकर साहेब. वनपाल पी.बी.ताटे साहेब. वनरक्षक पठाण साहेब. यादव साहेब.देवळे. साहेब. शेतामध्ये तात्काळ दाखल झाले व शेतामध्ये पिंजरे व कॅमेरे लावण्यात आले.व रात्रभर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घातली होती परंतु बिबट्याचा शोध लागला नाही आजूबाजूच्या शेतामध्येच बिबट्या असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच पार्ङी गणेशपुर सेवादास नगर भोजला जांबबाजार गाजीपुर येथील शेतकरी व सरपंचांना परिसरात बिबट्या वाघ असल्याचे वनविभागाने कळविले आहेदोन दिवसात दोन जनावरे बिबट्याने ठार केले त्यामध्ये माझे मोठे नुकसान झाले आहे वन विभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुभाष वांजळकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close