ईतर

उद्या पुसद येथे सकल मराठा समाजाच्या मराठा समाज योग भवनाचे भुमीपुजन होणार!

पुसद :राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन मिळालेल्या २कोटी रु च्या निधीतून पुसद येथे सकल मराठा समाजाच्या मराठा समाज योग भवनाची निर्मिती होणार असून प्रास्तावित योग भावनाचा भूमिपूजन समारंभ उद्या रविवारी१० मार्च २०२४ सायं. ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. दिनेश जाधव यांच्या घरासमोर येरावार -जाधव ले आउट येथे आयोजित केला आहे. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व सकल मराठा समाज बांधवांच्या पाठपुराव्या नंतर तसेच -वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग भवना साठी तात्काळ २कोटीचा निधी मंजूर केला.

सदर योग भवनाचे भूमिपूजन खासदार भावना गवळी यांच्या शुभ हस्ते पुसद विधानसभा आमदार ॲड. इंद्रनील नाईक,विधानपरिषद आमदार ॲड. निलय नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, भारती मैंद नागरी . सह. पतसंस्था, अध्यक्ष ॲड. अप्पाराव मैंद, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲड. आशिष देशमुख, जेष्ठ भाजप नेते एड. माधवराव माने, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप,भाजप पुसद जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे,श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुध्द पाटील चोंढीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close