सामाजिक

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली …!!!आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाची पंढरी पुसद नगरी प्रतीपंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी

पुसद : येथील प्रसिध्द वारकरी सांप्रदायाचे आराध्यदैवत विठुरायाचे मंदीर श्री ज्ञानेश्वर संस्थान, पुसद येथे बुधवार दि.१७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी निमीत्य भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेमध्ये १३५० सेवाधारी भाविकांचा मोठा सहभाग राहणार आहे. या भव्य दिव्य ऐतिहासीक आषाढी एकादशीच्या यात्रेचे भव्य आयोजनासाठी सेवाधारींची पहिली सभा ३ जुन २०२४ रोजी आणि सेवाधारींची दुसरी सभा रविवार दि. ३० जुन २०२४ रोजी, तिसरी सभा रविवार दिनांक ०७ जुलै २०२४ ला आणि प्रभारी, समिती प्रमुख आणि उपप्रमुख यांची चौथी आढावा बैठक शुक्रवार दि. १२ जुलै २९२४ ला श्री ज्ञानेश्वर संस्थान मध्ये संपन्न झाली. या सभेला श्री ज्ञानेश्वर संस्थान व श्री नानादेव संस्थान ची सर्व कार्यकारीणी तसेच महिला आणि पुरुष उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष बिपीन शा. चिद्दरवार यांनी या यात्रा महोत्सवाच्या आयोजनासंबंधी काही महत्वाच्या सुचना उपस्थित सेवाधारींना दिल्या. संस्थान द्वारा धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्याची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. या अनुषंगाने हया मोठ्या धार्मिक सोहळयामध्ये मंदीर व भोवतालच्या परिसरामध्ये सामाजिक विविध उपक्रमाचे जसे रक्तदान, नेत्रदान, देहदान, झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ भारत अभियान, स्त्रिभृणहत्या, बेटी बचाव बेटी पढाओ, करा योग रहा निरोग, पाणि अडवा पाणि जिरवा इत्यादी बाबतचे सामाजीक जनजागरण व्हावे यासाठी बॅनर लावण्यात येत आहे. या सोबतच रक्तदान व देहदानाच्या मोहिमेला चालना देण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी रक्तदान व देहदान संकल्प पत्र भरुन देणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. रक्तदान आणि मोफत बिपी, शुगर तपासणी शिबीराचे आयोजन मेडीकेअर ब्लड बँक तर्फे करण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या भाविकास दोन थेट दर्शन बेल्ट आणि लॉयन्स क्लबच्या वतीने देहदानाचे संकल्प पत्र भरुन देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. देहदान करणाऱ्या दात्यांने आपल्या सोबत कुटुंबातील कमीत कमी २ व्यक्तींना संमतीसाठी सोबत आणावे व दात्याचे आधार कार्डची छायांकीत (झेरॉक्स) प्रत आणि २ रंगीत पासपोर्ट फोटो आणने आवश्यक आहे. या देहदानाच्या शिबीरात नांव नोंदणी करणा?या दात्यासोबत कुटुंबातील २ व्यक्तींना थेट दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेश :दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी फक्त एकच प्रवेश मार्ग असुन तो गुजरी चौकातील मंडपाच्या प्रवेश द्वारातुन ठेवण्यात आलेला आहे. इतरत्र कुठुनही भाविकांना मंडपामध्ये प्रवेश करता येणार नाही. या सोहळयाच्या निमित्याने बस स्टैंड थांबा ते गुजरी चौक (संस्थान) आणि गुजरी चौक (संस्थान) ते बस स्टँड थांबा अशाप्रकारे भाविकांना मोफत ने-आण करण्याची व्यवस्था संस्थान तर्फे करण्यात आली आहे.दोन चाकी वाहनांची पार्कीग व्यवस्था बालाजी मंदीर, संतोषी माता मंदीर परीसर, मेढया मारोती सभोवतालचा परिसर, गोल्डप्लाझा (सुभाष टॉकीजची जागा) सराफा लाईन, चार चाकी वाहनांची व्यवस्था जुना सरकारी सि.सि.टिव्ही आणि कोषटवार हॉल मध्ये कठडे तयार करुन भव्य बारीचे आयोजन करण्यात येत आहे. महिला व पुरुष भाविकांना बारीमध्ये सोडण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. बारीमध्ये मंदीर परिसरात विठुरायाच्या दर्शनानंतर महाप्रसाद म्हणुन अंदाजे ५० क्विंटल साबुदाणा उसळीचे वाटप करण्यात येणार आहे. महाप्रसादासाठी सौ. शकुंतलाबाई आप्पारावजी मैंद, अॅड अतुल चिद्दरवार, नितीन चिद्दरवार, प्रविण चिद्दरवार, बिपीन चिद्दरवार, डॉ. सतिष चिद्दरवार, जयंत चिद्दरवार, हेमंत चिद्दरवार, संजय चिद्दरवार, सुरज चिद्दरवार, भागवत चिद्दरवार, अभिजीत चिद्दरवार, निखील चिद्दरवार, सचिन वटटमवार आणि निशांत देउळकर, हे आश्रयदाते लाभले आहे. तसेच राजगिरा लाडु प्रसादासाठी प्रा. अरुण तगलपल्लेवार, आनंद व आशिष शिरमवार, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रीडीट को. ऑप. सोसायटी नांदेड शाखा, पुसद चे पिग्मीकलेक्शन गृप, पुंडलीक चिद्दरवार, ऋषीकेश घाटे, संताजी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी, पुसद, सौ. सुरेखाताई सतिषराव गडम (पंढरपूर), संदीप जिल्हेवार, चंद्रकांत पदमवार, सुभाष डुब्बेवार हे आश्रयदाते लाभले आहेत. तसेच सर्व भाविकांना गादेवार परिवारातर्फे चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पुसद वैद्यकिय संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे डॉक्टरांची चमु प्रथमोपचार केंद्रात आपली सेवा देणार आहे. तसेच औषधीचे साहित्य औषधी विक्रेता संघातर्फे देण्यात येणार आहे. तसेच ग्रामिण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय चमु आणि रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याची ग्वाही वैद्यकीय अधिकारी सौ. भेलोंडे मॅडम यांनी दिली आहे. आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाच्या सपुर्ण सोहळयाला येणाऱ्या भाविकांसाठी थंड व शुध्द पिण्याचे पाणी कमलेश गहारवार आणि राजु सोनटक्के यांचे तर्फे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गजानन महाराज संस्थान सेवाधारी मंडळ, राजुभाउ पाटणकर, माउली गृप, अवि धनस्कर गृप व सकल जैन समाज यांचे मोलाचे सहकार्य या सोहळयाच्या यशस्वी आयोजनासाठी लाभणार आहे.या सोहळयाची सुरुवात सकाळी ४:००वाजता श्री विठ्ठलरुख्मीणी, श्री ज्ञानेश्वर माउलींना अभ्यंगस्नान दिपक आसेगांवकर आणि मधुसुदन महाजन सपत्नीक यांच्या हस्ते विधीवत अभिषेक, पुजा व ६ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. दर्शनाची वेळ सकाळी ७ ते रात्रौ ११ वाजेपर्यंत राहील. सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरीचे सामुहिक पारायण होईल व त्यानंतर संस्थान मधील कै. बापुराव चिद्दरवार सभागृहातील भव्य व्यासपिठावर सकाळी ८ ते सायं. ६ पर्यंत विठुनामाचा अखंड गजर, भक्तिगीत व भजनमाला कार्यक्रमामध्ये पुसद शहरातील विविध भजनी मंडळे सहभागी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हरीपाठ व सायं. ७ ते रात्रौ ९ बालयोगी प.पु. गजेंद्र महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तनाचा लाभ भाविकांनी घ्यावा. या भव्य यात्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी मंदीर प्रशासन, कर्मचारी बांधव, सिक्युरिटी गार्ड कार्यरत आहे. तसेच सेवाधारी भाविकांचे मोठे अमुल्य सहकार्य लाभत आहे. मंदीर व भोवतालच्या परिसरातील स्वच्छता, स्ट्रिट लाईट करीता नगर परिषेदेचे मुख्यअधिकारी अभिजीत वायकोस तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रीत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज आतुलकर, ठाणेदार उमेश बेसरकर, वाहतुक व्यवस्था पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पुसद शहर पोलीस स्टेशन तसेच महसुल प्रशासकीय उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरवर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा अखंडीत चालु राहण्यासाठी विज महावितरण मंडळाचे प्रतिक इंगळे साहेब सहायक अभियंता, महावितरण यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच आषाढी व्दादशीचे महाप्रसादासाठी सौ. वंदना बिपीन चिददरवार, दिलीप केशवराव रेवणवार, दिपक तुकारामपंत रेवणवार आणि अभिजित अनंतराव डुबे हे आश्रयदाते लाभले आहेत.आषाढी एकादशीच्या भव्य यात्रेत भाविकांनी सहभागी होवुन विठुरायाच्या प्रतिपंढरपुर दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा. असे संस्थानचे अध्यक्ष बिपीन चिद्दरवार यांनी कळविले आह

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close