माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांचा भाऊबीजेने पाझरले अंत:करण..

पुसद : सध्या सगळीकडे घराघरात भाऊबीज साजरी होत असताना,घरातून दूर सारलेल्या बेघर निराधार व उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा असहाय जीवनात कुठली आली दिवाळी. परंतु समाजात आजही माणुसकी जिवंत आहे. पुसद येथील माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या महिलां सदस्यांनी वृद्धाश्रमातील बेघर वृद्धांना भाऊबीजेला ओवाळनी घातल्याने या भाऊबिजेला सर्वसामान्याचे अंतकरण पाझरले आहे.
.त्यांना नवीन कपडे व मिस्टान्नाचा घास भरवला.वृद्धांचे अंतकरण भरून आले. माणुसकीची भिंत या सेवाभावी संस्थेच्या महिला सदस्यांनी यंदाही गरजवंतां सोबत अनोखी भाऊबीज साजरी केली. गेल्या नऊ वर्षापासून पुसद मध्ये त्यांचा हा मानवीय उपक्रम सुरू आहे.बेघर अनाथ गरजू व वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत भाऊबीज हा सण साजरा करतात. एक वेगळा आनंद बेघर प्रभुजींना व वृद्धांना मिळतो अशी या महिला सदस्यांची भावना आहे.
उपजिल्हा रुग्णालय, माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद येथे महिला समूह गुरुवारी पोहोचला व तेथील स्वच्छता करून रांगोळी काढली,पाटे मांडून त्यांना मायेने ओवाळले.त्यांना टावेल टोपी नारळ नवीन कपडे पेढा धोतर दिले.
घरी बनवलेला फराळ व पोळी भाजी भात बुंदीचे लाडू वड्या असे सुग्रास जेवण दिले व बेघर गरजू महिलांकडून माणुसकीची भिंत सदस्यांनी ओवाळून घेतले. त्यांना साडी लुगडे लहान बाळांना कपडे देऊन फराळाचे व जेवण देऊन भाऊबीज हा सण एका आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते



