Uncategorized

आज पुसद शहरात भारतीय जनता पक्षाच्या पुसद जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होणार!

पुसद: महामानव भारतरत्न’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून लाखो आंबेडकरी अनुयायींच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली व त्यांना आदरांजली वाहण्यात येतं आहे आंबेडकरी अनुयायांमध्ये दुखवटा पाळला जात असतो. परंतु पुसद शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुसद जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन थाटात उत्साहात केले जात आहे. त्यामुळे अनेक भिम अनुयायांनी आपल्या भावना वरिष्ठ भाजप नेत्यांना कळविल्या आहे.

आज महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी संपूर्ण भारतातून ६ डिसेंबरला भीम अनुयायी मुंबई येथील चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्‍यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्या वर्गाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की त्यांचे बुद्ध गुरु देखील डॉ. आंबेडकरांसारखे सद्गुरु होते. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतात मानणारा मोठा वर्ग आहे तो आजही या दिवशी दुखवता साजरा करीत असतो तर देशातील व राज्यातील प्रत्येक पक्षातील नेते आज सर्व सभा मीटिंग रद्द करून हा महापरिनिर्वाण दिन साजरा करतात परंतु पुसद शहरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने एवढ्या मोठ्या दिवसाचे महत्त्व बाजूला ठेवून आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार यवतमाळ मदन भाऊ येरावार, प्रमुख अतिथी रणधीरजी सावरकर प्रदेश सरचिटणीस तथा आमदार अकोला, उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री विदर्भ, राळेगावचे माजी मंत्री तथा आमदार अशोकजी उईके, विधान परिषद सदस्य तथा आमदार ॲड. निलयभाऊ नाईक, वणी चे आमदार संजयरेडी बोदकुरवार, केळापूरचे आमदार संदीपजी धुर्वे, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, उत्तमराव इंगळे प्रदेशाध्यक्ष अनु-जाती जमाती, माजी आमदार राजुभाऊ नजरधने, नितीन भाऊ भुतडा जिल्हा समन्वयक भाजप पुसद-यवतमाळ, तारेन्द्रजी बोर्डे जिल्हा अध्यक्ष भाजपा यवतमाळ, महादेवराव सुपारे पुसद जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे परंतु या जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जाणीवपूर्वक ६ डिसेंबर रोजी साजरा होत असल्याने भीम अनुयांच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या भावना भिम अनुयायांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे. हा उद्घाटन सोहळा आज न करता एक दिवस पुढे ढकलला असता तरी चालला असता परंतु पुसद भाजपने जाणीवपूर्वक हा उद्घाटन सोहळा आजच्या दिवशी केल्याने भीम अनुयांच्या भावना दुखावल्या जात असल्याची पुसद शहरात व संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close