ईतर

भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी अधिक सुरक्षित;सभासद, गुंतवणूकदारांनी भीती बाळगू नये – ॲड.अप्पाराव मैंद

पुसद : शहरांसह राज्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक मदत व्हावी या उदात्तहेतूने पंचवीस वर्षांपूर्वी ॲड.आप्पाराव मैंद त्यांची कन्या भारती मैद हिच्या नावाने पुसद शहरात अग्रगण्य ओळख असलेली भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली त्यामुळे या भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेतील सभासद, गुंतवणूकदारांच्या ठेवी सुरक्षित असुन सभासद, गुंतवणूकदार ठेवीदारांनी भीती बाळगू नये असे आवाहन ॲड. अप्पाराव मैंद यांनी केले आहे.

याबाबत भारती मैद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की,सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पुसद शहरात सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडविले. सामान्यांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने ॲड अप्पाराव मैंद यांनी २५ वर्षांपूर्वी त्यांची कन्या भारती मैंद हीच्या नावाने नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली. आज या पतसंस्थेच्या १८ शाखा कार्यरत आहेत.भारती मैद नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून स्वच्छ व पारदर्शक व्यवहार करण्यात येत असून ग्राहकांना गुंतवणूकदारांना तसेच ठेवीदारांना चांगल्या सुविधा व सेवा देत या पतसंस्थेने मोठी केलेली प्रगती कौतुकास्पद बाब आहे, तर भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमांतून सामाजिक भान ठेवून विविध सामाजिक कार्य सुद्धा केले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोट्यावधी रुपयांच्या ठेवी या नागरी पतसंस्थे जमा आहेत त्यामधून दरवर्षी पतसंस्थेला लाखो रुपये नफा मिळतो आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊ रोजगार मिळवुन दिला. या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. आलेल्या ठेवीमधून ७० टक्के कर्ज वाटप करण्यात आले. ३० ठेवी सुरक्षित आहेत. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ठेवीदारांचा गैरसमज झाला आणि भारती मैंद पतसंस्थेतून ठेवीदाराने ठेवी काढून घेणे सुरु केले आहे. त्यामुळे सर्व ठेवीदारांना मी आश्वस्त करतो की, आपल्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत. शांततेच्या मार्गाने प्रकरण निवळल्यानंतर आपल्याला गरज भासेल त्या प्रमाणे ठेवी परत करु. त्यामुळे ठेवीदारांनी पतसंस्थेतून ठेवी काढण्याची घाई करु नये असे जाहीर आवाहन भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. अप्पाराव मैंद यांनी केले आहे. एखाद्या प्रकरणात कर्ज बुडाले म्हणजे त्याचा परिणाम पतसंस्थेवर होत नाही. आमच्या पतसंस्थेत पारदर्शक व्यवहार आहेत. त्यामुळेच विश्वासावर नागरिकांनी ठेवी ठेवल्या आहेत. त्यास तडा जाऊ देणार नाही अशी सभासदांना ठेवीदारांना व गुंतवणूकदारांना ग्वाही दिली आहे. काही दिवसांमध्ये सर्व सुरळीत होईल. त्यामुळे ठेवीदारांनी गैरसमज करुन घेऊ नये. आपल्या ठेवीमधून कर्ज दिल्यामुळे वसुली सुरुच आहे. काल पर्यंत ठेवीदारांना नियमित व्याज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. चौकशी मध्ये चौकशी करणाऱ्याने बाईट दिल्यामुळे लोकांत संभ्रम होणे साहजिक आहे असे सांगुन ॲड. मैंद म्हणाले, मी स्वतः नागपूरला जाऊन इन्व्हेस्टीगेटरला सर्व माहिती दिली आहे. यामध्ये संचालक मंडळ एक दिलाने असुन आपल्या ठेवी सुरक्षित आहेत. कोणीही काळजी करु नये असे ॲड. अप्पाराव मैंद यांनी ठेवीदारांसाठी आवाहन केले आहे. भारती मैंद पतसंस्था ही सामाजिक उपक्रमामध्ये सुध्दा अग्रेसर आहे. झालेल्या नफ्यातून सामाजिक उपक्रमासाठी पुसद शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. मागील ५० वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात मी प्रामाणिकपणे काम केले आहे. कोणाची फसवणूक करणे हे आमच्या रक्तातच नाही. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढुन घेण्याची घाई करु नये. आपल्या ठेवी सुरक्षित आहेत असे सर्व ठेवीदारांना आव्हान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close