ईतर

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती पुसद तर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न!

पुसद:येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीद्वारे दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.३ जुलै २०२३ ला राजे उदाराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अध्यक्षस्थानी शंकर गो. पांडे,यांचे मार्गदर्शन तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री गणेश समुद्रे व श्रीमती डॉ.उमा देशपांडे यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले आणि प्रास्ताविक सौ.श्रेया सरनाईक यांनी केले याप्रसंगी सुमारे ३१ विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू व सन्मान चिन्ह देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन देशपांडे व सौ. शुभांगी दाभाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.नागेश गांधे यांनी केले.

याप्रसंगी ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश बल्लाळ, श्रीकांत सरनाईक,गजेंद्र पारटकर, चंद्रशेखर कोडापे, बाळासाहेब समुद्रे, अरविंद द्वारकानाथ , नितीन दाभाडकर, राजूभाऊ भगवतकर, मुकुंद कळसे गुरु ,दिलीप कुलकर्णी, नागेश गांधे, निलेश सिंहस्थे, सौ.गायत्री कोडापे ,सौ.सुचिता तांबेकर ,सौ साक्षी भगवतकर, सौ कांचन देशपांडे यांनी सहकार्य केले तर विशेष सहकार्य राजे उदाराम मंगल कार्यालयाचे मालक अँड.श्री अवधूत राजे यांनी विनामूल्य स्वतःची जागा उपलब्ध करून दिली तर रेणुका कॅटर्सचे मालक प्रशांत देशपांडे यांनी त्यांच्यातर्फे सर्व उपस्थितांना चहा वाटप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close