सावधान! सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज कमेंट व्हिडीओ टाकताल तर पोलीस कारवाई होणार!

पुसद:कोल्हापुर,अहमदरनगर,अकोला या जिल्ह्यामध्ये सोशल मिडीयावर अक्षेपार्य पोस्ट टाकल्यावरुण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती.त्या पार्श्वभुमिवर आज दि. ८ जून २०२३ रोजीचे १८/३० वा. ते १९/४० वा. पावेतो मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. पवन बन्सोड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पंकज अतुलकर सहा.
उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद यांनी उपविभागीय स्तरावर दंगाकाबु योजना रंगीत तालीम सराव घेण्यात आला. सदर सरावा मध्ये पोलीस स्टेशन पुसद शहर येथील ४ पोलीस अधिकारी, २० पोलीस अमलदार, १० होमगार्ड, पो.स्टे. वंसतनगर ३ पोलीस अधिकारी, १५ पोलीस अमलदार, पो.स्टे. पुसद ग्रामीण २ पोलीस अधिकारी, १२ पोलीस अमलदार, पो.स्टे. खंडाळा १ पोलीस अधिकारी, ७ पोलीस अमलदार, वाहतुक उपशाखा पुसद येथील २ अधिकारी ५ पोलीस अमलदार तसेच जवळील पोलीस स्टेशन दिग्रस, पोफाळी, महागाव, येथील ‘मनुष्य बळाचा रिसपॉन्स टाईम घेतला. सदर दंगाकाबु योजना रंगीत तालीम सराव पोलीस स्टेशन वंसतनगर हद्दीतील शिवाजी विद्यालय येथे घेउन पोलीस स्टेशन वंसतनगर
परीसरातील शंकुतलाबाई विद्यालय वंसतनगर, अक्सा मस्जीदमार्ग मौलाना अब्दुल कलाम मार्ग वंसतनगर गल्ली क्र.४, टिपूसुलतान चौक, रहेमानीया मस्जीद दुर्गामाता चौक, मोहमदीया मस्जीद छत्रपती शिवाजी महाराज चौक व पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीतील
शेतकी निवास, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ईत्यादी मार्गाने रुटमार्च घेन्यात आला पुसद शहर व परीसरातील नागरीकांना अवाहन करण्यात येत आहे की कोणीही सोशलमिडीयावर आक्षेपार्य पोस्ट टाकु नये फॉरवर्ड करु नये तसेच स्टेटस ठेवु नये तसे केल्यास प्रचलीत कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल या अनुषंगाने दंगाकाबु योजना रंगीत तालीम सराव व रूट मार्च घेण्याचा हा उद्देश होता.



