बंगलादेशी घुसखोरीचा मुद्दा घेऊन भाजपचे माजी खासदार कीरीट सोमय्या धडकले पुसद शहर पोलीस स्टेशनला!

पुसद :- बांगलादेशी ययघुसखोर, रोहिंग्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे रहिवासी प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये लाखो घुसखोर असल्याचा दावा पुराव्यासह सोमय्या यांनी केला होता. या संदर्भातील कागदपत्रं, पुरावे संबंधित जिल्ह्यातील तालुक्यात जाऊन ते महसूल प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, पोलिस प्रशासनाला माहिती देत दोषींवर कारवाईची मागणी करत आहेत.त्याच अनुषंगाने पुसद तालुका सोमय्या यांच्या निशाण्यावर आले आहे. ते बंगलादेशी घुसखोरीचा मुद्दा घेऊन त्यांनी बोगस जन्ममृत्यू रहिवासी प्रमाणपत्र प्रकरणी ५० जणांच्या विरुद्ध थेट शहर पोलीस स्टेशन पुसद येथे जाऊन तक्रार केली आहे किरीट सोमय्या अचानक पोलीस स्टेशनला धडकल्याने पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले व एकच खळबळ उडाली होती.
पुसद तालुक्यांसह शहरात अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या तसेच बोगस कागदपत्राच्या आधारे रहिवासी प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
याबाबत झेप न्यूजला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात दोन लाख २३ हजार नागरिकांना जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, रोहिंगे अथवा पाकिस्तानी नागरिकांना जन्माचे दाखले दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे रहिवासी प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली असून राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये लाखो घुसखोर असल्याचा दावा पुराव्यासह सोमय्या यांनी केली होती त्याच अनुषंगाने आज पुसद तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर तहसीलदार महादेव जोरवर नगर परिषदेचे मुख्यअधिकारी डॉ.अभिजीत वायकोस यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा करून पुसद तालुक्यांसह शहरात अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या तसेच बोगस कागदपत्राच्या आधारे रहिवासी प्रमाणपत्र संदर्भातील कागदपत्रं, पुरावे पोलिस प्रशासनाला माहिती देत बोगस जन्ममृत्यू रहिवासी प्रमाणपत्र प्रकरणी ५०जणांच्या विरुद्ध थेट शहर पोलीस स्टेशन पुसद येथ तक्रार केली आहे व तात्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तहसीलदारांची तक्रार घ्यावी, त्यांनी न दिल्यास त्यांच्यासह संबंधित अधिकारी व खोटे जन्म प्रमाणपत्र मिळविणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. परंतु पुसद शहरासह तालुक्यात बांगलादेशी घुसखोराची संख्या जास्त असल्याची माहिती असून पुसद हे घुसखोरीचे केंद्र बनले की काय.? यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस प्रशासना माहिती दिल्याचे सूत्राची माहिती आहे.यावेळी पुसद भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच किरीट सोमय्यांच्या ताफ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.



