ईतर
बाबाराव मडावी यांचा भाकर कथासंग्रह गडचिरोली विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात

यवतमाळ/प्रतिनिधी: येथील प्रख्यात साहित्यीक बाबाराव मडावी,आकांतकार यांचा भाकर कथा संग्रह गडचिरोली विद्यापिठात एम.ए.मराठी चे अंतिम वर्षाला अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला.त्यांचे आत्मकथन आकांत चा ही या विद्यापिठात एम.ए.भाग१ चे अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.बाबाराव मडावी यांचे कथासंग्रह, आत्मकथन, कादंबरी,कविता अभ्यासक्रमात पुणे,औरंगाबाद, नांदेड,अमरावती,अहमद नगर,गडचिरोली विद्यापिठात एम.ए ,बी.ए ला समाविष्ठ झाले. बाबाराव मडावी यांचे साहित्य वाचनिय तथा अभ्यासनिय ठरले असुन सर्वञ आनंद व्यक्त करण्यात येत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्व सामाण्या तळागाळातील जीवन जगणारा माणुस केंद्रबिंदु समजुन त्यांचा विविध अंगाचा आलेख बाबाराव मडावी यांचे साहित्यातुन पहायला मिळतो.



