ईतर
अभिमानास्पद!कोषटवार दौ. विद्यालयातील विद्यार्थीनी प्रज्ञा कांबळेला ऑलिम्पियाड परीक्षेत गोल्ड मेडल!

पुसद: येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु.प्रज्ञा कांबळे हिने माहे ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाड (SOF) या परिक्षेत शाळेतून तिसऱ्या क्रमांकात उत्तीर्ण होऊन गोल्ड मेडल प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेला हजारो विद्यार्थी,विद्यार्थिनी बसलेले होते. त्यातील इयत्ता साहावी मधून प्रज्ञा लक्ष्मण कांबळे ही
विद्यार्थीनी गोल्ड मेडल व प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली आहे.ती या यशाचे श्रेय तिचे आई-वडील ज्योती लक्ष्मण कांबळे यांचे मित्र मंडळ व वर्ग शिक्षकांना देत आहे.त्यामुळे तिचे सर्व समाज स्तरातून व शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीने कौतुक व अभिनंदन होत असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.



