ईतर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये राज्य प्रवक्ता म्हणून शेतकरी नेते मनीष जाधव यांची नियुक्ती!

पुसद :शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा परिणामाची तमा , न बाळगता घरावर तुळशीपत्र ठेवून वैयक्तिगत सुखाला तिलांजली देत समर्पणाने बारोमास कष्टाच्या वस्तीत राबराब राबणाऱ्या शोषित , पीढीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक व चिकित्सक अभ्यासू पणे भूमिका मांडणारे संपूर्ण तारुण्य शेतकऱ्यांच्या चळवळीत खर्ची घालणारे प्रगतशील शेतकरी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा म्हणून शेतकरी नेते मनीष जाधव यांची राज्यभर ओळख आहे गेली २७ वर्षा पासून शेतकऱ्यांच प्रश्नावर लढा अविरत देत आहे शेतकऱ्यांचे आराध्य पंचप्राण शरद जोशी साहेब व त्यानंतर शेतकरी नेते राजूभाऊ शेट्टी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मावळा म्हणून काम करत आहे शेतकऱ्यांचा असंतोष हा शासन व प्रशासन , प्रस्थापित व्यवस्थेशो भिडणारा यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेऊन रस्त्यावरची लढाई लढून अनेक वेळा शासन निर्णय घेण्यास भाग पाडणारा हा नेता यांच विधायक व उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची राज्य पातळीवर उचित कार्याची दखल घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ( प्रदेश प्रवक्ता ) ….पदी म्हणून नियुक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार खासदार आदरणीय राजूभाऊ शेट्टी साहेब यांच्या सूचनेवरून श्री संदीप भाऊ जगताप प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी काल दि.५ मार्च २०२३ रोजी पत्र पाठवून नियुक्ती दिली आहे यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर विदर्भामध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी गेली दोन दशकापासून सत्ताधारी शासन व प्रशासन दरबारी अविरत रस्त्यावरची लढाई लढत असून यासाठी त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले कधी रास्ता रोको , उपोषण ,धरणे , मोर्चा , घेराव अशा विविध आंदोलनाचे आयुधे घेऊन शेतकऱ्यांसाठी समर्पित भावनेने लढा दिला आहे या नियुक्तीसाठी प्राध्यापक संदीप भाऊ जगताप प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ( नाशिक) प्रा जालंदर पाटील ( कोल्हापूर) डॉ ,प्रकाशराव पोफळे ( नांदेड ) श्री अमर पाटील ( बारामती) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा उच्च अधिकार समिती यांनी या नियुक्तीला अनुमोदन दिले आहे या पदनियुक्तीचे सर्व स्तरावर राज्यभर स्वागत होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close