राजकिय

पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदांसाठी १४ तर नगरसेवकपदासाठी १८२ उमेदवारांचे अर्ज वैध!

पुसद : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी साठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी २४ तर ३१ नगरसेवक पदासाठी २२६ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. आज नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी १४ इच्छुक उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र  वैध ठरले तर नगरसेवक पदासाठी १८२नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निखिल अनिल चिद्दरवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ.मोहिनी इंद्रनिल नाईक तर महाविकास आघाडीचे अधिकृत डॉ. मोहम्मद नदीम, शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार ॲड. अनिल रामलोचनसिंह ठाकुर व अपक्ष राजु नथ्थुजी दुधे यांचा समावेश आहे. तर इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये अब्दुल तौसीफ अब्दुल हमीद अपक्ष, अहेमद माजीद सलाम, बुध्दरत्न पुंडलिक भालेराव वंचित आघाडी, मोहम्मद अहेसन मोहम्मद उस्मान, दिलीप एकनाथ रायपुरकर अपक्ष, रेश्मा गजानन लोखंडे अपक्ष, अमजद शमशेर शाह, सैय्यद समीर सैय्यद मुस्ताक व सैय्यद सिद्दीकोद्दीन सैय्यद सैफोद्दीन एमआयएम यांचा समावेश असून यांचे नामनिर्देशन पत्र वैद ठरले आहे.

पुसद शहरात एकूण १५ प्रभाग असून ३१ नगरसेवक पदे आहेत.प्रभागनिहाय वैध ठरलेले उमेदवार : प्रभाग क्र. १५मध्ये ३ उमेदवार निवडुन द्यावयाचे आहेत र इतर सर्व प्रभागात प्रत्येकी २ असे एकूण ३१ नगरसेवक निवडुन द्यावयाचे आहेत. ते पुढीलप्रामणे- प्रभाग क्र. १ अ (सर्वसाधारण महिला): दुधे जयश्री राजु, राठोड शिवानी अनिल, वाकडे शिवानी दिलीप, प्रभाग क्र. १ ब (सर्वसाधारण): अंभोरे विवेक छगन, जाधव सोमेश्वर दतात्रय, दुधे राजु नथ्थुजी, मो. इकबाल मो. इसाक, शिंदे अभिमन्यू पुंडलिक, शेख रेहान शेख रिजवान व सैय्यद सलमान सैय्यद लुकमान प्रभाग क्र. २ अ (अनु. जमाती): गव्हाळे छाया काशीराम, दळवे पौर्णिमा माधव, बळी प्रगती लक्ष्मण व शिकारे कल्पना विष्णू, प्रभाग क्र. २ ब (सर्वसाधारण): अंकुशकर विशाल बबनराव, चव्हाण अनिल श्रीरंग, चव्हाण सुभाष विठ्ठलराव, डोळस देविदास उकंडराव, पंडितकर ऋषीकेश गजानन, राठोड विजय मेरसिंग, राठोड सचिन उध्दव व हरणे बिपीन सोपान, प्रभाग क्र. ३ अ (सर्वसाधारण): कुरेशी शेख महेबुब शेख फत्तू, खान मजहर खान ताहेर, खान समीर ताजखान, मोहम्मद राजीक मोहम्मद तैयाब, शाह असेल शमशेर व सैय्यद जुबेर सैय्यद अलीम, प्रभाग क्र. ३ ब (सर्वसाधारण महिला): खान हिना कौसर शहेबाज, जावेद निलोफर परवीन मोहम्मद जावेद, सुमैय्या परवीन मोहम्मद शहबाज, सैय्यद नुसरत परवीन अन्वर अली व सैय्यद रुकय्या बेगम मुजोफरोद्दीन, प्रभाग क्र. ४ अ (सर्वसाधारण): कान्हेड तेजस किर्तीकुमार, अब्दुल वहाब अब्दुल लतीफ, नरसिंग सागर विनोद, निचत माणिकराव महादेव, पानपट्टे अभिजीत प्रकाश, मोहम्मद आसिफ शेख महेबुब, सैय्यद तस्लीम सैय्यद मुसा, सैय्यद मन्नान सैय्यद करीम, प्रभाग क्र. ४ ब (सर्वसाधारण महिला): आहाळे सरिता मंगल, गवळी विशाखा सुशांत, गावंडे राधिका सचिन, चालिकवार विजया सुधाकर, नुजहत खातुन जमीरोद्दीन सैय्यद, मुनज्जा परवीन मजहर खान, मुळे आशा संतोष, रुकसाना बी शब्बीर खान, सैय्यद नुसरत परवीन अन्वर अली व सोनटक्के रेखा विजय, प्रभाग क्र. ५ अ (सर्वसाधारण): टाले राजेश्वर मनोहर, दळवी राजेश भिकाजी, महाकाळ अक्षय संजय व विश्वकर्मा मोहन दुर्गाप्रसाद, प्रभाग क्र. ५ ब (सर्वसाधारण महिला): ॲड. सौ. कुंदा राजेश चिद्दरवार, गुरुवानी सिध्दी हरीष, तिवारी निकिता धीरज, डुब्बेवार जयश्री धनंजय, पापीनवार सीमा अजय व मुक्कावार शीतल गोकुळ, प्रभाग क्र. ६ अ (ओबीसी) : आगाशे दिव्या लक्ष्मण, गुध्दटवार शुभांगी विष्णू व डंबोळे श्वेता प्रशांत, प्रभाग क्र. ६ ब (सर्वसाधारण): काळे महेश श्रीरंग, गौरी अब्दुल रहेमान फिरोज, ठाकुर अर्जुनसिंह अनिलसिंह, शेख मुसवीर शेख मस्तान, साळुंके राजेश मल्हारी, प्रभाग क्र. ७ अ (सर्वसाधारण): नेमायते योगिता प्रकाश व सैय्यद नाजमाबी अन्वर, प्रभाग क्र. ७ ब (सर्वसाधारण) : चव्हाण संजयसिंह हनुमानसिंह, जीवन खान अफजल खान, थोटे अक्षय सुनिल, देशमुख बाळासाहेब रावसाहेब, पठाण अमजद खान नजीर खान, लोखंडे सुरज अर्जुनराव, शेख जफर मीया अजगर मीया, शेख जब्बार शेख युसुफ, शेख शकील शेख मुनाफ, शेख साकीब उज जमाशेख व संतोष नारायण मुडे, प्रभाग क्र. ८ अ (सर्वसाधारण) : जाधव कृष्णा पुंजाराम, मोहम्मद नाजीम राज मोहम्मद निजाम, शाह गुलशर इब्राहीम, शेख सुलतान शेख अब्दुल व सोहेल शाह समशेर शाह, प्रभाग क्र. ८ ब (सर्वसाधारण महिला) :अहेमद शमीम बानो अकील अहेमद, खान उमरीन गाजी उस्मा, खान यास्मीन समीर, खान हिना परवीन, पठाण इसरत अंजुम असद खान, पठाण महेरुनिस्सा असद खान, मोहम्मद नसिमा परवीन मोहम्मद नाजीम राज, प्रभाग क्र. ९ अ (सर्वसाधारण महिला): मोहम्मद नादरीन सुफीया मोहम्मद इमरान अत्तार, लमत अर्शिया शेख अतिक,शेख नसरीन बानो तस्लीम, समीना खानम फिरोज खान, प्रभाग क्र. ९ ब (सर्वसाधारण महिला): अब्दुल कमर रज्जाक अहेमद माजीद सलाम, खान अमजद खान हमजा, खान असद अजगर खान, मोहम्मद नदीम अब्दुल रशिद, शेख कय्युम शेख मुनाफ, प्रभाग क्र. १० अ (ओबीसी महिला): पवार वनिता आशिष, राठोड सुनिता अविनाश, सपना गणेश पवार, साळुंके ऐश्वर्या राजेश, प्रभाग क्र. १० ब (सर्वसाधारण) : गावंडे शशांक पंजाबराव, पवार निरज जगदीश व फाट े नामदेवराव बारीकराव, प्रभाग क्र. ११ अ (अनु. जाती) : उंटवाल नटवरलाल गणेश, खडसे विठ्ठल सुदाम, गायकवाड नारायण रामजी, धीरे रंगनाथ शिवाजी, बुध्दरत्न पुंडलिक भालेराव, भगत अर्जुन साहेबराव, विघ्ने पद्माकर नागोराव व सांबरे रंजीत धर्मीदास, प्रभाग क्र. ११ ब (सर्वसाधारण महिला): उखळकर मयुरा दीपक, जयस्वाल रुपाली पंकज, देशमुख शिल्पा सुधीर, पवार सपना गणेश व शिंदे रत्नप्रभा अनिल, प्रभाग क्र. १२ अ (अनु. जाती) : खडसे शिवाजी विजय, जाधव अजय प्रल्हाद, तायडे माणिक गणपत, थोरात शिवाजी माणिक, दत्ता चिमणाजी गंगाळे, राऊत अरुण संभाजी व वाढवे विक्की धोंडबा, प्रभाग क्र. १२ ब (सर्वसाधारण महिला) : उतळे शितल पांडुरंग, जगताप अर्चना राजेंद्र, निखाते छाया विजय, पवार रुपाली नितीन, बाबर उज्वला विजय व व्यवहारे नलिनी रविंद्र, प्रभाग क्र.१३ अ (अनु. जाती महिला): अंभोरे सुशिला लक्ष्मण, कांबळे पंचशिल राहुल, खडसे ज्योती अमोल, घाटे सविता विशाल, चापके विद्या उत्तम, तुंडलायत पुजा नितीन व तुंडलायत रेखा मनोज, प्रभाग क्र.१३ ब (सर्वसाधारण) : चौहान मोहम्मद हनिफ गणी ताज, जिंदरान मोहम्मद सादीक मोहम्मद अयुब, जुबेर अहेमद सिद्दीक अहेमद, डंगोरिया श्रीरी लक्ष्मण, डॉ. अकील मेमन, मोगरे रवि किशोर, मोहम्म अयसन मोहम्मद उस्मान, मोहम्मद रहेमान मोहम्मद अस्लम व सैय्यद बिलाल सैय्यद रहेमान, प्रभाग क्र.१४ अ (महिला): उचित निकिता संजय, करमनकर सुनिता दिनेश, कांबळे अंशका संतोष, कांबळे ज्योती लक्ष्मण, सौ. चंदाताई संतोष वाघमारे, पडघने गौकर्णा उत्तम, भागवत विद्या हरीष व राऊत सोनाली अरुण, प्रभाग क्र. १४ ब (सर्वसाधारण): उबाळे जयानंद विजय, जाधव भारत मधुकर, दरणे संतोष नारायण, दर्शन रामदास जोगदंडे, पद्मवार अभिजीत सुभाष, सुरोशे पंजाबराव भीमराव व सोनटक्के ओमकार दत्ता, प्रभाग क्र. १५ अ (सर्वसाधारण महिला): जाधव दिपाली दिनेश, दरणे वर्षा संतोष, सौ. मंगला शेखर वानखेडे, लोंढे संगिता गणेश व हरीमकर अर्चना दीपक, प्रभाग क्र.१५ ब (सर्वसाधारण महिला):चव्हाण अनिता भारत, जाधव सपना अरुण, जिल्हेवार अश्विनी विक्रांत व भरगाडे विजया श्रीराम,प्रभाग क्र. १५ क (सर्वसाधारण): काळे दिपक नथ्थूजी, गादेवार उध्दव वसंत, गादेवार निखिल ज्ञानेश्वर, पापीनवार उमाकांत वासुदेव व सावळे शामा मारोती यांचा समावेश आहे. अपिल नसल्यास १९ ते २१ नोव्हेंबर पर्यंत तर अपिल असल्यास दि. २१ ते २५ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून दि. २६ नोव्हेंबर रोजी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार महादेव जोरवर हे काम पाहत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे.

या निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये मतभेद उफाळल्याचे स्पष्ट संकेत आहेत जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवाराचे नामांकन अर्ज वैध ठरले आहे . महायुतीतील सहकारी पक्षाने शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने एकमेकांच्या विरोधातच दंड थोपटल्याने “आमने-सामने” दिसणार आहेत त्यामुळे पुसद शहरात महायुतीला तडा गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रजी नाईक यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वतःच्या पदरी पाडून घेतल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते विद्रोहाच्या भुमीकेत असल्याची सध्या चित्र पहायला मिळत आहे तर या निवडणुकीच्या मैदानात सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता पक्षात राहुन उमेदवाराला चालेल का हा प्रश्न? सर्वसामान्य मतदाराला पडला असल्याने या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्याची प्रतिष्ठापनाला लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close