पुसद तालुक्यातील जुनुना येथे शेतकऱ्यावर कोसळली वीज; पावसाळ्यात जीवितहानी टाळण्यासाठी तहसीलदारांचे ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन!

पुसद : तालुक्यातील मौजे जुनुना शेतशिवारात दि.१५जुन २०२४रोजी५:३०वाजण्याच्या सुमार अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी जुनुना येथील शेतकरी संतोष नारायण वाळसे वय ४५ वर्ष हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाला त्यावेळी या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मीळताच नातेवाइकांनी व अन्य ग्रामस्थांनी त्याला तात्काळ पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.पुन्हा त्याला पुसद उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूचे नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जुनूना येथे मयत संतोष वाळसे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी,वडील,भाऊ असा अपत्य परिवार आहे.या घटनेमुळे जुनुना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेची माहिती पुसद तहसील प्रशासनाला मिळतात त्यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला असुन नायब तहसीलदार कदम व तलाठी यांनी आपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन तहसीलदार पुसद यांना अहवाल सादर केला आहे.
तालुक्यातील नागरीकांनी व शेतकऱ्यांनी पावसाळ्यात विजांपासुन सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी ‘दामिनी ॲपचा’ वापर करण्याचे आवाहन – महादेव जोरवर तहसीलदार पुसद,
पुसद तालुक्यात सुरक्षात्मक उपाययोजनंतर्गत सर्व तालुक्यांतील सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाउनलोड करून वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे.‘दामिनी’ हे ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून, वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अशा वेळी सुरक्षित स्थळी जावे आणि झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात यावे. गावातील नागरिकांनी हा ॲप डाउनलोड करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. यासाठी सोशल माध्यमासह विविध माध्यमांतून प्रसिद्धी द्यावी.ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधितांच्या बैठका घेणे, गावात दवंडी द्यावी असे पत्र महादेव जोरवर तालुका दंडाधिकारी पुसद काढले वीज पडून होणारी जीवित आणि टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.