नगर परीषेदेच्या सफाई कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही!- लक्ष्मण कांबळे जिल्हाध्यक्ष रिपाई कामगार आघाडी

पुसद:शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचे घाणीमधील कामामुळे त्यांच्या आयुष्याचे प्रमाण कमी आहे. घाणीच्या कामामुळे त्यांना अनेक आजारांना बळी पडावे लागते. कधी कधी तर सफाई कामगारांचा आजारपणामुळे मृत्यूही होत असतो. सफाई कामगारांच्या कामाचे स्वरूप व त्यांची परिस्थिती पाहून केंद्र, राज्य सरकार व नगरपरिषद यांनी अनेक कायदे बनवले आहेत. सफाई कामगारांना सरकार आणि नगरपरिषदे कडून अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र पुसद नगरपरिषद जाणीवपूर्वक सफाई कामगारांना या सोयी सुविधा उपलब्ध करून देत नाही किंवा त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी सुध्दा केली जात नसल्याने या नगर परिषदेतील सफाई कामगाराच्या विविध समस्या बाबत रिपाई आठवले कामगार आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन नगरपरिषदेत सुरू असलेल्या सफाई कामगारांवरील अन्याय अत्याचार खपवन घेतला जाणार नसल्याचे निवेदनाद्वारे कळविली आहे. 
याबाबत प्राप्त माहिती अशी की, सन २०२१-२२ पासून नगर परिषद पुसद मध्ये प्रशासक कार्यकाळ चालू आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात आज रोजी एकूण १६९ सफाई कामगार असून यामध्ये पुरुष कामगार कर्मचारी संख्या १०३ आहे.पण प्रत्यक्ष ४० ते ४५ कामगार कामावर रोज हजर राहतात आणि यामध्ये केवळ १५ ते २० सफाई कामगार नाल्या व घाण साफ सफाई करण्याचे कामे करतात आणि ह्यापैकी उर्वरित ३० सफाई कामगार ज्यांची मुळ नियुक्ती सफाई कामगार पदावर झाली असताना सुद्धा त्यांना इतर आर्थिक व सलोख्याचे संबंध जोपासून त्यांना नगरपालिकेच्या जसे की वाहन चालविणे, शिपाई, मुकदम, जमदार यापदावर विविध विभागात त्यांची नेमणुक केलेली आहे. परंतु हे सर्व सफाई कामगार यांची मूळ ऑर्डर सफाई कामगार म्हणून झालेली आहे. शासनाच्या लाड समितीच्या घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार यांना इतर विभागातील कामे देता येत नाही तरीही नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे हे प्रकार राजरोस पणे सुरू आहेत.नुकतीच ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली त्यामुळे पुसद परिसरात पाणीच पाणी साचले पण खरी परिस्थिती पाहता नगरपालिकेमध्ये १०३ पुरुष सफाई कामगार असतांना या आणीबाणीच्या काळात फक्त १५ सफाई कामगारावर संपूर्ण गावाची साफ सफाईची कामे लादण्यात आली होती. हा मोठा अन्याय या सफाई कामगारावर झालेला आहे मागील काही ८ ते ९ महिन्यापासून या साफसफाई कामगारांची कुठल्याही प्रकारची आरोग्य विभागामार्फत हजेरी घेतल्या जात नाही. पण पगार मात्र १०३ साफसफाई कामगाराचा नियमित होत आहे.आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याकडून आर्थिक हितसंबंध जोपासून पदोन्नत्या देण्यात येतात. हे वास्तव्य आहे अशाप्रकारे पदोन्नती मिळविने गाडी चालक यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव/लाइसन्स धारक नसतांना वाहने हाताळतात त्यामुळे इतर सफाई कर्मचा-यांच्या जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.अशाप्रकारे विना पदोन्नती वरच्या पदावर काम करणारे कर्मचारी हे सफाई कामगारांना मानसिक त्रास, शिवीगाळ करुन अन्याय करत असतात. सफाई कामगारांना रजेसाठीही आर्थिक देवाण करावी लागत असल्याचे समजते बरेच सफाई कामगार घरी बसून वरिष्ठांना दरमहा आर्थिक लाभ देऊन पगार मात्र शंभर टक्के करून घेतात.पुसद न.प.मध्ये १०३ सफाई कामगार असतांना सुध्दा पुसद शहरात न.प.अंतर्गत एकुण १४ प्रभाग व २९ वार्ड आहेत.या संपूर्ण प्रभागांचे काम केवळ १५ ते १६ कामगारांच्या माध्यमातूनच केली जातात व कामे करावे लागतात. त्यामुळे आज कार्यरत असलेल्या पदोन्नती ह्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून आर्थिक देवाण-घेवाण करून झालेल्या आहेत ह्या पदोन्नती मध्ये खोटी मेडीकल प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र दाखवुन मिळविलेल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याची सुध्दा चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतः लक्ष घालून आपले स्तरावरुन चौकशी करुन दोषी व भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच विनापदोन्नती वरचे पद उपभोगनारे तसेच घरी बसून पगार घेणारे कर्मचारी यांची शाहनिशा करुन त्यांना मुळ पदावर आणण्यात यावे, व कामावर रुजु करावे,अन्यथा वरील विषयाच्या निवेदनाची येत्या १५ दिवसात दखल न घेतल्यास आम्हास रि.पा.ई. (आठवले) कामगार आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मोर्चाचे आयोजन करुन न्याय मागावा लागेल. किंवा होणाऱ्या अन्याया विरोधात आम्हास उपोषणाचा मार्ग सुध्दा अवलंबवावा लागेल,अशा विषयाचे निवेदन देण्यात आले पुढील होणाऱ्या आंदोलनात व परिस्थितीस सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी, न.प.पुसद यांची राहिल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे या निवेदनावर रिपाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, अंबादास वानखेडे, भास्कर बनसोड, दिनेश सावळे, नितीन नकवाल, भारत घड्याळे, कपिल डागर, रोहित सोनवाल, राजू नकवाल, कपिल टाक, जयवंत उचित, मनोज गाडे, राज सावळे, विशाल वाघमारे, सिद्धार्थ हटकर, शुभम वंजारे, गुलाब गोमाशे, अमोल गोमाशे, विक्रांत तुपसुंदरे, विशाल शिंगारे, ऋषिकेश खरारे इत्यादी पदाधिकारी व सदस्याच्या सह्या आहेत..



