चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी;आंबेडकरी समाज आक्रमक!

पुसद :उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी चंद्रशेखर यांच्या शरीराला स्पर्श करुन गेली होती आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी व विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक संघटना संविधान प्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त करीत निदर्शने देत उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते बाल बाल बचावले. जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखर आझाद यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीआंबेडकरी अनुयायी तसेच विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मनुवादी विचारसरणीचा निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. तर भीम आर्मीचेराष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने संपूर्ण भारत बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा जीवघेणा हल्ला मनुवादी विचारसरणीच्या जातीयवादी गुडांनी सुनियोजित कट असून यापूर्वीही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यातून ते सुखरुप बचावले. भाई चंद्रशेखर आजाद यांना सुरक्षा सुरक्षा देण्यात यावी याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे,परंतु इथल्या बीजेपी सरकारने याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे जे कोणी हल्लेखोर आहे त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घ्यावा तसेच भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी अन्यथा भीम आर्मी संघटनेच्या वतीने संपूर्ण भारत भर आंदोलन छडेल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भीम आर्मी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, देवेंद्र खडसे,किशोर कांबळे जिल्हाध्यक्ष भिम टायगर सेना, बुद्धरत्न भालेराव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,राजेश ढोले , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, लक्ष्मण कांबळे शहराध्यक्ष आरपीआय आठवले गट, भारत कांबळे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, प्रसाद खंदारे शहर महासचिव वंचित बहुजन आघाडी, गोपाल जगताप शहराध्यक्ष आजाद समाज पार्टी,अजय लोखंडे शहराध्यक्ष भीम आर्मी, पत्रकार कैलास श्रावणे,विजय निखाते , प्रकाश खिलारे, दिनेश खांडेकर,अंबादास वानखेडे, नितेश खंदारे,नितीन सरोदे , भैय्यासाहेब मनवर, यशवंत पठाडे, माणिक जाधव,ओमप्रकाश गवई, दत्ता कांबळे,अरुण राऊत,राजरत्न लोखंडे, किसन सरकुंडे,आशाताई टाळीकोटे,चंद्रकला टाळीकोटे, दीपक कांबळे,अक्की चौरे,रमेश बेद्रे,गणेश भगत आदी सामाजिक कार्यकर्ते अनुयायी उपस्थित होते.