ईतर

पुसद शहरातील बंद पडलेले अखिल भारतीय फुटबॉल सामने पुन्हा सुरू होणार -ॲड विरेंद्र राजे यांची पत्रकार परिषदेत माहिती!

पुसद : शहरात चेतना क्रिडा मंडळाच्या वतीने भैय्या साहेब राजे तथा कै. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचे स्मृति प्रित्यर्थ असलेले अखिल भारतीय फुटबॉल सामने हे  यवतमाळ येथील पोलीस प्रशासनाने सन २०२३ मध्ये जुन्या प्रकरणांचा हवाला देऊन आयोजन रद्द केले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या परवानगी अभावी सामन्यांचे आयोजन चेतना किडा मंडळाला रद्द करावे लागले. जवळ पास ४७ वर्षाची अखंडता अखील भारतीय फुटबॉल सामन्यांची श्रृंखला अशा परवानगी अभावी स्थगीत झाल्होयाने या कार्यवाहीने व्यथीत होवून चेतना क्रिडा मंडळाचे अध्यक्ष ॲड विरेंद्र जगजीवन राजे यांनी मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथे ॲड.अमेय मोहरील यांच्यावतीने याचीका दाखल केली होती. या याचीकेचा क्रमांक ९४५/२०२४ असा होता. त्या मध्ये मा. खंडपिठाने दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सदर याचीकेलाच मा. जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी मंडळाच्या पुढील सामन्यांचे नियोजनाचे आयोजनपत्र आवेदनपत्र समजावे असे सुचित केले. त्या साठी सरकारी वकील साहेब यांना देखील सुचित केले की, प्रस्तुत याचीकेची प्रत आणि प्रस्तुत आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना पाठवावा. जेणे करुन त्या संबंधी योग्य ती कारवाई करतील. मुळात मंडळाचे सामने आयोजनाचे संबंधी मा. खंडपिठाच्या आदेशाने आनंदाचे वातावरण निर्माण होवून पुढील काळात अखिल भारतीय फुटबॉल सामने पुसद येथे पुन्हा सुरू होतील  या बद्दल शंका राहीली नाही. या संबंधी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड विरेंद्र जगजीवन राजे, जेष्ठ सदस्य तथा उपाध्यक्ष इद्रिस खान सर, सचिव सुशिल दिक्षीत सर, प्रितीन आहाळे तसेच आजी माजी खेळाडू व किडा प्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close