ईतर

अखेर कर्करोगाशी झुंज संपली; पत्रकार दिनेश खांडेकर कालवश!

पुसद : येथील रहिवासी असलेले पत्रकार दिनेश रोहिदास खांडेकर यांनी पत्रकारीक्षेत्रात ओळख मिळवली होती. मात्र ते मागिल एका वर्षापासून कर्करोगाच्या आजारानेे ग्रस्त झाले होते, गेली काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होता.अखेर कर्करोगाशी असलेली झुंज संपली दि. २६ रोजी सकाळी ११:०० वाजता संभाजीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी कर्करोगाच्या आजारानेे पत्रकार क्षेत्रातील हळव्या मनाचा पत्रकार हरपला आहे.मृत्यूसमयी ते ४९ वर्षांचे होते. सायंकाळी ४.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला.दिनेश खांडेकर हे कर्करोगाचा सामना करत असतांना त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. त्यांच्या समोरील संकट आणखी वाढले होते.त्यांनी एका दैनिक वर्तमानपत्राचे पुसद तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहिले तसेच ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांनी सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला होता तसेच ते पुसद येथे प्रबोधनपर्व आयोजन समिती पुसदचे सुद्धा उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी उज्वला, मुलगी मनस्वी, एक भाऊ, बहिणी, वडिल व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुंबावर व मित्र परिवार वर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close