अफजलखानाच्या वधाने वेधले सर्वांचे लक्ष;विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल पुसदचे शोभायात्रेत उत्कृष्ट सादरीकरण

पुसद: येथे छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद द्वारा शिवजन्मोत्सवा निमित्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेत्र दीपक अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शाळा महाविद्यालयांसोबतच भजनी पथक, लेझीम पथक, मल्लखांब पथक, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य पथक, ढोल पथक यांनी सहभाग नोंदवला होता.
या शोभा यात्रेमध्ये पोदार स्कूल मधील 30 विद्यार्थ्यांनी मिळून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मुघलांचे अत्याचार, महाराजांचा जन्म ते अफजलखानाचा वध या संपूर्ण घटनांचे सादरीकरण अतिशय प्रभावी व नीटनेटकेपणाने सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शालेय उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेल्या पोदार स्कूलने या शोभा यात्रेत सुद्धा आपली एक वेगळी छाप निर्माण केली.
श्री शिवाजी महाराज व अफझल खान यांची भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांची देहबोली व अभिनय हा कसलेल्या अभिनेत्यासारखा होता.छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कृष्णा पवार,राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत कृतिका रुडे, अफजलखानाच्या भूमिकेत साई बंग या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच मावळे व इतर भूमिका आर्या गावंडे, अथश्री भांद्क्कर, रितिका खंदारे, सदया मोरे, अमृता मोरे, आर्या जाधव, आरोही घटमल, मनस्वी बासटवार, मीरा पटेल, हर्षिता आडे, जान्हवी पाटील, पारस आहाळे, मयूर राठोड, अथर्व भांगे, रुद्र चव्हाण, समर्थ भोने, अनय ठाकरे, जय राठोड, कृष्णा चव्हाण, सार्थक मार्कड, सत्यम जाधव, सार्थक पवार, सोहम पांडे, सुशांत आढाव, कृष्णा चव्हाण, रुद्र आडे, शिवांश दूधेवार इत्यादी विद्यार्थ्यांनी साकारल्या.छत्रपती श्री शिवाजी महाराज व अफजल खानाची भूमिका निभावणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैंद, सचिव श्री सुरज डुबेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष मनिष अनंतवार, सहसचिव श्री संगमनाथ सोमावार, शाळेच्या प्रिन्सिपल सौ अनुपमा भट देशमुख व सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सादरीकरणाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील तृप्ती हस्तक, धनश्री राठोड, राजरतन कांबळे, वर्षा पाटील या शिक्षक बंधू भगिनींनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.