पांदन रस्ता खुला करून देण्याच्या आश्वासनानंतर वरोडी येथील शेतकऱ्याच्या उपोषणाची सांगता!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):तालुक्यातील वरोडी येथील शेतकऱ्याने मागील ४ वर्षापासून पांदण रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाचे दरबारी हेलपाटे मारले पण त्याची आजपर्यंत कुठलीच दखल न घेतल्यामुळे हतबल शेतकऱ्याला शेवटी महागाव तहसील कार्यालयासमोर मागील तीन दिवसापासून उपोषणास बसावे लागले होते ३० मे पर्यंत पांदन रस्ता जाण्या योग्य करून न दिल्यास ३१ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता उपोषणाला बसले होते रस्ता देणाऱ्या आश्वासनानंतर आज दि. २ जून रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली .
मोतीराम तुकाराम अडकिने यांनी शिव पांदन रस्त्यासाठी महागाव तहसील समोर मागील तीन दिवसापासून उपोषणास बसलेले होते आज भूमि अभिलेख आणि महागाव तहसील ची चमू प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना ४५ दिवसाच्या आत रस्ता करून देऊ रस्ता शिव पांदन रस्ता करून देऊ अशी असे आश्वासन दिले , आश्वासनानंतर समाधान व्यक्त करून मोतीराम अडकिने यांनी तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या हातून फळाचा रस घेऊन उपोषणाची सांगता केली .
यावेळी उपोषण मंडपात महागांव पोलीस निरीक्षक दीपक पाटील ढोमणे ,नायब तहसीलदार सुनील देशमुख ,संदीप ठाकरे माजी पंचायत समिती सदस्य, डॉ. स्वप्नील गावंडे वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी राम पंडित ,तलाठी अनिल खडसे ,मधुकर अडकिने,व अक्षय बोनगुलवार यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.



