ईतर

कठोर परिश्रमाला ज्ञान, कौशल्याची जोड द्या!- उपायुक्त एकनाथ पावडे ; गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन

पुसद: गुणवंतांनी मिळविलेल्या कठोर परिश्रमाला ज्ञान आणि कौशल्याची जोड देऊन समाजातील गरजूनां मदत करा असे आवाहन यवतमाळचे जीएसटी उपायुक्त एकनाथ पावडे यांनी केले.ते मराठा कुणबी समाजातर्फे पुसद येथील विरंगुळा केंद्रात रविवारी (ता.२०)आयोजित केलेल्या गुणवंतांच्या गुणगौरव समारंभारात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप हे होते.प्रमुख अतिथी म्हणून दिग्रसच्या निवासी नायब तहसिलदार स्नेहल देशमुख,यवतमाळ येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा उमरखेड कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डाॅ.विजयराव माने,प्रतिथयश बालरोग तज्ज्ञ डाॅ.भानुप्रकाश कदम, प्रतिथयश ह्रदयरोग तज्ज्ञ डाॅ.स्वप्निल देशमुख,
प्राचार्य    डाॅ.हेमंत महल्ले,प्रा.डाॅ.चंद्रप्रकाश खेडकर, अमेरिकास्थीत संगणक अभियंतासचिन नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमांचे पूजन करुन माल्यार्पण केले.जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.पुढे बोलतांना, श्री.पावडे यांनी ‘आहे रे’ कडे सर्व काही असून गाव खेड्यातील कष्टकरी माणूस शिक्षणासारख्या बाबतीत कोसो दूर आहे.कष्ट अन् संघर्षाशिवाय काहीही मिळणार नसून येणारे अडथळे ह्या संधी समजून वाटचाल करा.पालकांनी आता आपल्या पुढच्या पिढीच्या प्रगतीसाठी तयारी केली पाहिजे.अनावश्यक गोष्टींवरील खर्च कमी करून तो शिक्षणाकडे वळवला पाहिजे.

जे कष्टातून आणि संघर्षातून पुढे जातात त्यांना समाजाच्या,जातीपातीच्या पलिकडची माणसे ही मदत करतात. डाॅक्टर व इंजिनिअर ह्याच मोठ्या संधी न मानता कठोर परिश्रम व संघर्ष करणार्‍याला हजारो वाटा आहेत. सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत होऊन त्याचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे.

आज मनात येईल ती कल्पना करिअर आहे ! बिझनेस आहे !!
गरज आहे पाऊल टाकण्याची…
चला वाटचाल करूया…
असे अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर जगताप यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन केले. डाॅ.विजयराव माने यांनी समाजातील वंचितांना पुढे आणण्यासाठी समाजातील धुरंधरांनी मोठ्या मनाने त्यांना जवळ करावे असे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. सचिन नरवाडे यांनी अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयनांना कशाप्रकारे मदत करुन मराठा सेवा संघाचे काम पुढे नेत असल्याचे सांगितले. अमेरिकेतील भारतीयांची एकत्र मोट बांधून भारतीय संस्कृतीचे जतन करीत असल्याचेही सांगून अमेरिकेतील भारतीय तरुणांना असलेल्या संधी विषद केल्या. डाॅ.भानुप्रकाश कदम यांनी गुणवंतांनी मिळविलेल्या या यशावरच न थांबता सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत राहा,अविरत परिश्रम करुन स्वत:चे समाजाचे व देशाच्या नावलौकिकात भर टाकण्याचे गुणवंतांना आवाहन केले.

समायोचित भाषणे केली.यावेळी दहावी, बारावी, नीट,जेईई,शिष्यवृत्ती परिक्षांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व नैपुण्य प्राप्त शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पालकांच्या समवेत सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक व पुसद अर्बन बॅंकेचे संचालक निळकंठ पाटील,बाबासाहेब नाईक सह.सुतगिरणीचे संचालक दिलीप पाटील कान्हेकर,संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर टेटर पाटील,प्रा.डाॅ.दिनकर बाजड,डाॅ.आशाताई कदम,किरण देशमुख सवनेकर,मंचकराव देशमुख,शशिकांत जामगडे,कैलास जगताप,विजय ठाकरे,विजय देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत महल्ले यांनी केले.सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी केले.

उपस्थितांचे आभार अमोल जगताप यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक काळे,शंकर गावंडे,शिवाजी कदम,मनोज ठाकरे,सुरेश वानखेडे,गोपाल सुरोशे, हरिभाऊ ठाकरे, हरगोविंद कदम, गजानन यादव,संदीप पाटील, प्रदीप गावंडे,सचिन सुरोसे, सोनू पाटील, सचिन सवाई, ज्ञानेश्वर बांडे, श्रीधर चांगुने, राजू चव्हाण,अवधूत मुळावकर,सचिन ठाकरे,नागेश जोगदे,रवी घड्याळे,संतोष भेंडे, अमोल उबाळे,मोंटु देशमुख, दीपक गावंडे, परमानंद जोगदंड यांचेसह मराठा—कुणबी समाज च्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close