भोजला येथून धारधार शस्त्रासह आरोपी ताब्यात;स्थागुशा यवतमाळची मोठी कारवाई!

पुसद:पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतील कलम ३०७ भादवि वगेरे गुन्ह्यांतील नजरेआड असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी भोजला येथून धारधार शस्त्रासह ताब्यात घेवून वसंत नगर पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यवतमाळ जिल्हा कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अउघड गुन्ह्यांतील. आरोपीचा शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आवरीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या असता दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील भोजला येथील टी पाइंटवर हजर असतांना गोपनिय मुखबीरव्दारे माहीती मिळाली कि उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक३६८/२०२३ कलम ३०७,३२४,३२३, २९४, १४३, १४७,१४८,१४९ भांदवि मधील नजरेआड असलेला आरोपी इसम नाम शेख बाबू शेख आयुब वय २० वर्षे, रा. डॉ जाकीर हुसेन वार्ड उमरखेड हा भोजला येथील शेख अकबर शेख हसन यांच्या घरी थांबलेला असून धारधार शस्त्र स्वतः जवळ बाळगून आहे. तसेच त्याने काळया रंगाचा गोल गळ्याचा टि शर्ट व गुलाबी रंगाची डिझाईन असलेलो हाफ पेन्ट परिधान केलेला आहे. अशी गोपिनिय खबर मुखबिरव्दारे मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पंचासमक्ष घटनास्थळ गाठून आरोपी शेख बाबू शेख आयुब वय २० वर्ष, रा. डॉ. जाकीर हुसेन भाई उमरखेड यास भोजला येथील शेख अकबर शेख हसन यांच्या घरातून ताब्यात घेवून तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणची पंचासमक्ष घरझडती घेतली असता तो राहत असलेल्या ठिकाणी त्याचे जवळ एक धारधार तलवार मिळून आल्याने जप्त करून आरोपी नाम शेख बाबू शेख आयूब वय २० रा. डॉ. जाकीर हुसेन वार्ड उमरखेड यांचे विरुद्ध पी. स्टे वर्तननगर येथे आमेट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, पोहवा तेजाब रंणखांब, पाहवा सुभाष जाधव नापाक कृणाल मुंडोकार नापाको सोहेल मिर्झा नापोको पंकज पातुरकर, पोशि सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज दिगवर गित सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



