ईतर

अपघात! ऑटो पलटी झाल्याने एक विद्यार्थी ठार, तीन विद्यार्थी गंभीर जखमी

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : आज दि. २७ ऑक्टोंबर २०२३ शुक्रवारला सकाळी ०६:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील मार्डी येथून शाळकरी विद्यार्थांना घेवून येत असलेल्या ऑटो पिसगावला पलटी झाला. या अपघातामध्ये अनिकेत श्रावण पिंपळशेंडे वय १६ वर्ष रा. केगाव हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर तीन विद्यार्थी जखमी झाले. सदर वृत्त असे की, मार्डी येथून निघालेला ऑटो पिसगाव जवळ येताच पांढरकवडा येथून येत असलेल्या दुसरा ऑटो भरधाव वेगात येत असल्याने धडक टाळण्याकरिता चालकाने ब्रेक दाबल्याने समोर बसून असलेल्या अनिकेतच्या बाजूने ऑटो पलटी झाल्याने अनिकेत ऑटो खाली दबल्या गेला व काही फूट पुढे घासत गेला. यामुळे अनिकेतच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. पिसगाव येथील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना दिली व जखमी विद्यार्थ्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close