आभाळ फाटलं, मतदारसंघातील बाधित कुटुंबांना शरद मैंदं यांचा मदतीचा हात!
नेता असवा तर असा जनतेच्या सुखदुःखात धावणारा नकी बंगल्यात एसीमध्ये बसवणारा!

पुसद : नुकतेच ऑगस्ट महिन्यात आभाळ फाटलं, अक्षरश: पावसाने हाहा:कार माजवला आहे. बळीराजाच्या हातितोंडाशी आलेला निसर्गाने हीरावुन घेतला आहे परंतु बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधीनी प्रशासनाने कींवा सरकारकडून मदत करण्यात आलेली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा नेत्यांनी मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला नाही. पिक डोळ्यादेखत वाहून गेलं, घरं पडली, काही लोकांचे बळी गेले, जनावरं दगावली अन् शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मदत मात्र शून्य परंतु अशा परीस्थितीत मात्र पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद मैद हे सामाजिक कार्याने पछाडले असून नुकसान ग्रस्त बळीराजाच्या बांधावर व गाव गावांत जावुन बाधितांना जिवनावशक वस्तू कीट देवुन नुकसान ग्रस्तांना आधर देत असुन त्यांचे मनोधैर्य वाढवित आहेत.त्यामुळे मतदारसंघात शरद मैंदं यांच कौतुक केले जात आहे नेता असवा तर असा..
पुसद मतदारसंघात मागील वर्षीच्या अतिवृष्टी मध्ये तालुक्यातील शेकडो पुर बाधितांना शरद मैंद यांनी धान्य किट व साहित्य वाटप केले होते. यावर्षी देखील अतिवृष्टी मुळे बाधित शेंबाळ पिंपरी व शेलू सर्कल मधील पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदतीचा हात पुढे केला. १६ते १९ ऑगस्ट दरम्यान पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेंबाळपिंपरी व शेलू जिप सर्कल मधील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. १९ऑगस्ट रोजी शरद मैंद व सहकार्यांनी शेलू सर्कल मधील बीबी, गौळ ,आसोली ,दहिवड तसेच शेंबाळपिंपरी जिप सर्कलच्या जगापुर, गौळ, देवगव्हाण व इसापूर गावातील नुकसानग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला भेटी देऊन शेतीची व गावाची पाहणी केली.बळीराजाच्या कोट्यावधी रु च्या पिकांची हानी होऊन नाल्या लगतच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. त्या सर्व कुटुंबाला धीर देत त्यांचे मनोधैर्य वाढविले .धरणापासुन ३किमी अंतरावर देवगव्हाण येथील २ व इसापूर येथील २ नाल्यालगत राहणाऱ्या ४ पूरग्रस्त कुटुंबांना संसारसाठी आवश्यक भांडे तर देवगव्हाण व इसापूर येथील ५० कुटुंबाना ८ ते १०दिवस पुरेल एवढ्या अन्न धान्याच्या किटचे वाटप केले. तसेच ग्रामसेवकाना दूरध्वनी वरून संपर्क साधून पंचनामे त्वरित करण्याचे सांगितले.निसर्गाच्या तांडवा मध्ये सर्वस्व गमावलेल्या नुकसान ग्रस्त ग्रामस्थांना लोकप्रतिनिधी पोहोचण्यापूर्वी शरद मैंद यांच्या मदतीमुळे पीडित कुटुंबाच्या चेहऱ्यावर थोडे का होऊना समाधान दिसत होते. इसापुर येथील ८२कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे यावेळी त्यांना आढळून आले.याप्रसंगी देवगव्हाण व इसापूर येथील डॉ. अजित चंदेल,दादाराव काळे, पिराजी काळे, दत्तराव चंदेल, प्रसाद चंदेल, विजय चव्हाण (ग्रा प सदस्य), पंडितराव देशमुख कान्हेकर ,बबनराव कुलदीपके (ग्रा प सदस्य), दिनेश चव्हाण, गुलाब (बंडू) चंदेल, नारायण काळे, संतोष काळे, दत्ता काळे, निलेश चंदेल, तन्मय चंदेल, पृथ्वीराज चव्हाण, तर इसापूर अमजद खान ,भास्कर थोरात ,जि के थोरात ,नईम खान इजारदार ,उमेश कान्हेकर ,बंडू सावजी ,लेख इब्राहिम ,आबाजी चव्हाण शेख ताहेर शेंबाळपिंपरी येथील बापूराव कांबळे, शेख मतीन पैलवान, हकीम सिद्दिकी, इमरान खान पठाण व अनेक गावकरी उपस्थित होते.