ईतर
पिंपळखुटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन!

दारव्हा/प्रतिनिधी : तालुक्यातील भव्य रक्तदान शिबीर पिंपळखुटा येथे कार्तीक पोर्णीमेनिमित्त्य १६ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यायलय येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
यवतमाळ येथील शौर्य ब्लड बैंक सेंटरनी रक्त संकलीत केले. तसेच रक्तदान करणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तुही देण्यात आल्या. या रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे
म्हणुन नायब तहसिलदार संजय जाधव, वसंत राठोड, युवराज चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन जगदिश राजु चव्हाण यांनी केले होते.