आता लाडक्या बहिणींसाठी मोफत बँक खाते उघडण्याची सुवर्णसंधी:पुसद अर्बन बँकेच्या सर्व शाखांमध्ये सुविधा!

पुसद:नुकतेच राज्य शासनातर्फे२१ते ६५वर्ष वयोगटातील शासन निकषात बसणाऱ्या महिलांना मासिक १५००/-रु.चे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन कॉ ऑप बँकेच्या सर्व ३८शाखा मध्ये वरील योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य बॅलेन्स वर मोफत खाते उघडण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबाजणी सुरु झाली आहे.खाते उघडण्यासाठी आधार कार्ड व २ पासपोर्ट फोटो या कागदपत्रा खेरीज कोणताही खर्च लागणार नाही.दरम्यान ज्या लाभार्थी भगिनींचे पुसद अर्बन बँकेत जुने बचत खाते आहे त्यांना दुसरे खाते उघडण्याची गरज नसून त्याच खात्यात अनुदानची रक्कम जमा होऊ शकते.बँकेच्या सर्व शाखा मधील अधिकारी कर्मचारी सेवाभावी असून शून्य बॅलेन्स वर खाते उघडण्याच्या या संधीचा योजनेस पात्र सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व संचालक मंडळाने केले