पुसद: जगतजोत्यी महात्मा बसवेश्वर माहराज यांची ९१९वी जयंती शुक्रवार ( दि १०)मे रोजी शहरात वीरशैव लिंगायत समाज व जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती २०२४ यांच्या वतीने महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या जयंती उत्साहानिमीत्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.अशी माहीती आयोजकांच्या वतीने दिली आहे.महात्मा बसवेश्वरांनी जात, धर्म, वर्ण, लिंग, व्यवसाय, लहाण मोठा, श्रीमंत-गरीब यापैकी कोणत्याही बाबीला अनुसरुन व्यक्तीचे महत्व कमी किंवा अधिक लेखले नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती समान होती. कारण ते मानवतेला साध्य समजायचे. पण हा भावसुद्धा तेव्हाच निर्माण होऊ शकतो जेव्हा आपल्यातली ‘अहम’ किंवा गर्व पणाची वृत्ती संपुन जाते. याविषयीची त्यांची ती भूमिका ते ‘मजवीना नाही अन्य कोणी लहान, शरणांवीना नाही कोणी महान नाही’अशा या महामानवाचा जयंती वीरशैव लिंगायत समाज व जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती २०२४ च्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा ९१९ वी जयंती मोठ्या उत्सवात दि १० मे २०२४ शुक्रवारला मोठ्या उत्साहात साजरा केली जाणार आहे. महात्मा बसवेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात फार मोठी क्रांती घडवून आणली त्यांनी लोकशाही संसद म्हणजे अनुभव मंटपाची स्थापना केली या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. महात्मा बसवेश्वरानी समाजातील रूढी परंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टीची अमंलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणुन महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून केली अशा ह्या महामानवाच्या विचाराची ओळख समाजाला व्हावी या उद्देशान सर्व समाज बाधंव व महिला भगीनी सह भव्य मोटर सायकल रॅली, भव्य शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.१० मे२०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता लिंगायत मठ व मारोती मंदीर देवी वार्ड येथुन भव्य मोटार सायकल रॅली काढली जाणार आहे या रॅलीत वीरशैव लिंगायत समाजातील महिला, पुरुष पारंपारिक पोशाख परिधान करून उपस्थित राहणार आहे हि रॅली देवीवार्ड येथुन निघून नेताजी सुभाषचंद्र चौक, माहमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वतंत्र सेनानी बाबासाहेब मुखरे चौक, वसंतराव नाईक चौक, महात्मा फुले चौक, श्रीरामपुर येथील महात्मा बसवेश्वर यांचे फलकास हार अर्पण करून परत बस स्थानक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, छत्रपती वीर संभाजी महाराज चौकातून देवी वार्ड येथील मठामध्ये येईल त्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन व सामुहिक आरती होईल सांयकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास शोभायात्रेस सुरुवात होईल यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची पालखीसह बसवेश्वर यांची झाकी घोड्यावर विराजमान, मुख्य आकर्षण शंकर, पार्वती, नंदी, कार्तिक, गणपती भव्य रथामध्ये विराजमान, भजनी मंडळ, ट्रॅक्टर मध्ये भगवान शिवाची, महात्मा बसवेश्वरांची, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची मुर्ती विराजमान राहील तसेच प्रभू श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानजी यांची सुंदर झाकी राहील. अचलपुर येथील प्रसिद्ध बॅन्ड पथक, बंजारा कलावंतांची डफडी ईत्यादी राहणार आहे. शहराच्या विविध चौकातून मार्गक्रम करत परत लिंगायत मठामध्ये येईल. रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. महाप्रसाद सौ.संध्या सुशील रोहडकर यांचे कडुन आहे. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष संतोष तडकसे पुसद यांनी केले आहे असे सचिव प्रशांत शिवणकर यांनी माहिती दिली आहे.