ईतरक्राइम

सासरच्या जाचांला कंटाळून विवाहीत महिलेची आत्महत्या; पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मुंगशी येथे एका नवविवाहितेने सासरच्या व पतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार वय २० वर्ष हिचा मुंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार यांच्यासोबत एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. जागतिक पाच ते सहा महिन्याचे गरोदर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळाली आहे. शेतामध्येया विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आई-वडीलनां कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले त्यावेळी मृतदेह पाहून आईवडीलांनी टाहो फोडाला घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला महीती देण्यात आली त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला व मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पुसद येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला.मात्र सासरच्या मंडळींनी व पतीने सातत्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू करून तिला सतत मारहाण करत राहत होते. या रोजच्या जाचाला कंटाळून अवघ्या वीस वर्षाच्या नव विवाहितीने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली. या घटने संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विशेष तारासिंग पवार पती, सासरा तारासिंग पवार, सासू नंदाबाई तारासिंग पवार,ननंद कु.सारिका तारासिंग पवार वय २७ वर्ष या सर्व सासरच्या मंडळी विरुद्ध त्या मुलीचा अतोनात छळ केल्यामुळे व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे आई -वडीलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम८५/८०,१०८,३५२,३ (५)यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा बीट जमदार अधिक तपास करीत आहेत.या घटनेची तक्रार घेण्यास पोलीस टाळटाळ करीत असल्यामुळे त्रस्त माहेरच्या नातेवाईकांना बराच वेळ थोपवून ठेवलं, त्यामुळे पोलीस सदर गंभीर प्रकरण दाबण्याच्या तयारीत होते असा आरोप मृतक विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close