वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे एका५२ वर्षी इसमाचा अपघातांत दुदैवी मृत्यू!

पुसद: शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे वाहतूकीचा बोजवारा उडाला असून शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. वाहन पार्किंगचा विषय गंभीर बनत चालला असून, अतिक्रमणांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. वाहतूक कोंडी हा रोजचा प्रश्न बनल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या असून ह्या अपघाताची मालिका संपन्याचे नाव घेत नाही आजच पुन्हा या रहदारीच्या बेशिस्तीमुळे व वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जड वाहनाने वाहनाने एका ५२वर्षीय इसमाला जबर धडक दिली तर दुसऱ्या वाहनाने चिडल्याने त्या इसमाचा जागिच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यामुळे पुसदकराची वाहतूक समस्येतून लवकर सुटका होईल अशी शक्यता दिसत नाही.या अपघातातील मृत इसमाचे नाव नारायण माधव कापशे (वय ५२) असे आहे. याप्रकरणी संतोष रामा कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसंत नगर पोलीस ठाण्यात क्रेन वाहन चालक चंदन महाराज यादव वय २३ रा. कुकी पटी. मध्य प्रदेश याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील मांडवा येथील रहिवाशी नारायण माधव कापसे हा शासकीय कामासाठी पुसद येथे आला असता तो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंचायत समितीकडे जात असतांना अशावेळी शेबाळ पिंपरी येथून क्रेन पुसद मार्गे यवतमाळ कडे जात होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायी चालताना नारायणच्या डोक्याला ट्रेनची जबर धडक लागली नारायण हा जागीच पडला अशातच पाठीमागून येत असलेली सफारी कार एम एच १३ यु एच५५५१ चार चाकी गाडीच्या खाली आला असता आजूबाजूच्या नागरिकांनी धावा घेऊन त्या सफारी गाडीच्या खालून त्याला काढले व उपजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित करून शवविच्छेदना करिता पाठवण्यात आले नारायण च्या पश्चात पत्नी एक मुलगा असा आप्त परिवार आहे पण घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चौकात वाहतूक पोलिसांचे नियोजन असते तर हा अपघात कदाचित झाला नसता त्यामुळे या अपघाताला वाहतूक पोलिसाचा दिशा कारभार जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे. या अपघाताची पुढील कारवाई वसंत नगर पोलिसांकडून केली जात आहे.



