निवडणूकीचे बिगुल वाजले! पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग अनेकांचे स्वकर्तुत्व मात्र शून्य! नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकाचे देव पाण्यात.!

पुसद : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.सर्वच पक्षातील इच्छुकांनी या निवडणुकीत उमेदवारी डोळ्यासमोर ठेवुन उमेदवारीसाठी भाऊ गर्दी केली आहे, आपल्या वरीष्ठ नेत्यांना आकर्षित करण्यासाठी आदि पासुनच वेगवेगळे फंडे वापरण्यात सुरवात केली होती त्याबरोबर भूलभूलैया चा खेळ सुरू आहे. अनेक इच्छुक गुढग्याला बाशिंग बांधून उताविळा नवरा अशी स्थिती निर्माण झाली आहे.नगर परीषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुसद भाजप पक्षाने आपली निवडणूक रणनीती निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती की स्वबळ यावरही चर्चा करण्यात आली.तसेच यावेळी नगराध्यक्ष पदाकरिता इच्छूक असलेल्या ११ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.बरेच ईच्छुक असल्यामुळे नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी ही फक्त एकाच व्यक्तीला मिळणार असल्यामुळे भविष्यात याचा परिणाम निवडणुकीवर पडु नये. या अनुषंगाने कोणत्याही एका इच्छुक उमेदवारी मिळाली तर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्या उमेदवाराला तन-मन-धनाने सोबत राहून भाजपाचा झेंडा नगर परिषदेवर फडकविण्याचा निर्धार केला आहे.दुसरीकडे भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत असल्यामुळे पुसद शहरासह ग्रामीण भागात विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुसदच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. व भविष्यातही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार असे प्रतिपादन माजी आमदार ॲड. निलय नाईक यांनी केले असून नगरपरिषदेच्या अनेक प्रभागांमध्ये मागील काळात झालेल्या विकास कामांचा या निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा सपाटा सुरु आहे. त्याशिवाय भाजपने आता इनकमिंगसाठी भाजपचे दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या उलथापालथी होण्याच्या शक्यता आहेत.एकीकडे राष्ट्रवादीला शह देण्याची रणनीती आखली जात आहे.महायुतीतील अंतर्गत कलह व पक्षातील गटबाजीमुळे या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या बैठकांना जोर लावला आहे.मात्र निवडणुकी आधी भाजपची मोठी खेळी, ‘इनकमिंग ‘वाल्यांना लॉटरी लागणार असल्याचे चित्र आहे ,पण निष्ठावंतांचं काय.?या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच रंग चढला आहे. त्यामध्ये भाजप, आघाडीवर आहे जोरदार प्रचार यंत्रणा राबवून आम्हीच या शहराच्या विकासासाठी कसे लायक आहोत,हे पटवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. निवडणुकीच्या तोंडावर जोरात विकासकामे जहिर करत घोषणा भूमिपूजन करायचा मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते काम कशी झाली त्याची दखल सुद्धा घेत नाही त्यामुळे या शहरांची परीस्थिती अशी झाली की “आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय” त्यामुळे शहरातील मतदार भाजवर नाराज आहेत.या शहरात स्वतंत्र पुर्व काळापासून प्रस्थापितांची एकहाती सत्ता आहे तरीही हे शहर विकासापासून कोसो दूर आहे.शहरात लाखो रुपये निधी खर्च केला गेला परंतु झालेल्या कामांचे मुल्यमापन कधी कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही टक्केवारीच्या ग्रहणामुळे शहरांच्या विकासाची संपूर्ण वाट लागली आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी कोण.. नेते.. व कोणते. राजकीय पक्ष जबाबदार आहेत ते सुज्ञ नागरिकांनी विचार करण्याची आता गरज आहे. दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणूकीच्या संदर्भात राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकत विचार विमर्श झाला की १९५२ पासून पुसद नगर परिषदेवर नाईकांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवावी असा काही कार्यकर्त्यांचा सूर निघाला. परंतु सर्वसमावेशक चर्चेनंतर युती की स्वबळावर निवडणुका लढवाव्या याचे सर्व अधिकार राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांना देण्यात आले.ते पक्षातील पदधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य राहतील अशा भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आल्या परंतु या पक्षात सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी चांगलीच ओढ लागलेली दिसत आहे.तसेच महविकास आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ते इच्छुक उमेदवार त्यांच्या नातेवाईकां पासून झाडून सारे कामाला लागले आहेत. सर्वच आघाडीवर आहेत.प्रत्येकाला हवी संधी पाच वर्ष दहा वर्ष संधी मिळवूनही काहींनी केला कारभार मात्र शून्य.. आहे आता ही निवडणूक लागल्याने अनेकांनी मतदारांची पाय पकडण्याची ढोंग सुरू केली आहे.अनेक इच्छुक या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहे .सौम्या -गोम्या पासून ते दिग्गजांचा यात समावेश आहे.पुसद नगर परिषदेमध्ये या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असून १५ प्रभागांमध्ये ३१ नगरसेवकाच्या पदासाठी उमेदवार उभे राहणार आहेत.आज निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असुन नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात- १० नोव्हेंबर, आहे तर नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर, ही आहे नामनिर्देशन छाननी कार्यक्रम -१८ नोव्हेंबर रोजी होणार असून अपील नसल्यास माघारीचा दिवस -२१ नोव्हेंबर हाआहे तर अपील असल्यास माघारीचा दिवस- २५ नोव्हेंबर हाआहे. निवडणूक चिन्ह व अंतिम यादी जाहीर करण्याचा दिवस- २६ नोव्हेंबर असून प्रत्यक्ष मतदान दि.- २ डिसेंबर रोजी होणार आहे.व प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल दि.३ डिसेंबर रोजी लागणार आहे.त्यामुळे सध्या निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे.प्रत्येक गल्लीत इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रत्येक इच्छुक व प्रत्येक पक्ष शहरात, गल्लीत विविध कार्यक्रम घेत आहे आपण इच्छुक असल्याचे सांगताना दिसत आहे .सध्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक जागेकरिता दहा जण आज इच्छुक असून प्रत्येकाला वाटते मलाच उमेदवारी मिळणार त्यामुळे आपापले नेते त्यांच्या बरोबर असलेली फोटो सोशल मिडियच्या साह्याने नागरिकांन पर्यंत पौहचवत आहे व मीच कसा नेत्यांच्या जवळ आहे हे दाखवत आहे .तर काहीजण चौका चौकात बसून शहरातील विविध गोष्टीवर नजर ठेवून तेथून राजकारण हालवत आहे तर अनेकाना बरेच घोड्यावर बसवत आहे .त्यामुळे शहरांत अनेक गट बनले असून ,सगळ्या पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे .सध्या प्रत्येक ठिकाणी शहरात सोशल मीडियावर मोठी हलचल सुरू आहे.वाढदिवस कोणाचा असो हालचाल कट्टर समर्थक की झाले मग झाली आपली हवा असे वारे अनेकांच्या डोक्यात घुसले आहे .त्यातून मग अनेक नेते मंडळी त्याच्या एखाद्या कार्यक्रमात गेले की तो हरभराच्या झाडावर जाऊन बसला कोणाचे ऐकत नसल्याचे दिसून येत आहे .अनेक जण पैशाची हवा करीत आहे .किती लागूदे असे खुलेआम बोलत आहेत अनेक इच्छुकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे.येथील अनेकांना केवळ प्रतिष्ठा व मान मिळावा यांसाठी नगरसेवकपद हवे आहे .त्यातून समाजकार्य करावे नगरसेवक पासून आमदार , खासदार मंत्री व्हावे असे कोणाला वाटत नाही फक्त हवी खोटी प्रतिष्ठा त्यासाठीच इच्छुकांनी या निवडणुकी करिता मोर्चे बांधणी सुरू केली आहे .उताविळा नवरा गुढ्घ्याला बाशिंग अशी परिस्थिती निर्माण झाली .त्यामूळे पुसद नगर परिषदेचे राजकारणात हालचाल सुरु आहे. परंतू स्वतः चे कर्तुत्व शून्य….. निवडणूक लढवायची एवढीच इच्छा…. नेत्यांची मर्जीसाठी पुसद शहरात खेकडा संस्कृती मात्र जोमात आहे…. तरी कोणाचे कुठे ठीगाळ बसेल यासाठी प्रयत्न सुरु असून मलाच पक्षाचे तिकीट मिळणार असे म्हणणारे स्व्यंघोषित नेत्यांची चलती तर नेत्यांच्या कानाला लागणारे बोलघेवडे…. यामुळे शहरात ह्याला गाड त्याला गाड एक ग्रूप सक्रिय आहेत… यामुळें शहरात शेकडो इच्छूांचे वर्चस्वासाठी राजकारण सुरू आहे व तसा प्रत्येक पक्षातील काही इच्छुक प्रयत्न करीत आहेत.सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. ही निवडणूक चुरशीची होणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.



