राजस्थान मंडळ पुसद ची नविन कार्यकारणी गठीत..

पुसद/प्रतिनिधी : शहरातील राजस्थान मंडळ पुसद ची नविन कार्यकारणी राजस्थान मंडळ च्या आमसभेत गठीत करण्यात आली.मागिल कार्यकारणीचा कार्यकाळ संपला असल्याने राजस्थान मंडळ ची आमसभा अग्रवाल मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. सभेमध्ये माजी अध्यक्ष चंद्रकान्त गजबी व सचिव अँड. विनोद पनपालीया यानी आपले मनोगत व कार्यकाल संपल्याचे सांगितले. नविन कार्यकारणी तयार करण्यासाठी मुख्य मतदान अधिकारी डॉ.मदन मुंदडा तथा मतदान अधिकारी (पंच) म्हणून श्री.राधेश्याम जांगिड, श्री. किरण बगडे, श्री. राधेश्याम शर्मा, श्री . डॉ. राजेन्द्र जाजु यांची उपस्थीती होती.सर्व प्रथम अध्यक्ष पदासाठी विजय भांगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, कार्याध्यक्ष पदी गोंविद वर्मा ,सचिव डॉ. सचिन कोठारी , उपाध्यक्ष संतोष दिक्षीत , कोषाध्यक्ष गणेश अग्रवाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.नविन कार्यकारणी चे आमसभेत सर्वाचे पुश्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच राजस्थान समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीचा विविध पदावर नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. राजस्थान मंडल च्या आमसभेचे संचालन व मार्गदर्शन डॉ. मदन मुंदडा यांनी केले तर आभार अँड. विनोद पनपालीया यांनी मानले. आमसभेला राजस्थान मंडळ चे राजस्थानी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.