पुसद शहरात खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयातील घृणास्पद कृत्य! उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा वीनयभंग; कंपाउंडरसह डॉक्टर वरही पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल!

पुसद : शहरातील एका खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याची धक्कादायक व घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. हे घृणास्पद कृत्य केल्याप्रकरणी पुसद शहर पोलीसांनी रुग्णालयांतील एका कंपाउंडरसह हे घृणास्पद कृत्य दडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयाचे संचालक डॉकटरवर ही भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे या घृणास्पद कृत्य प्रकरणातील आरोपी सध्या फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे परंतु रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पुसद शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांवर समाज देवासारखा विश्वास ठेवतो.त्यावेळी रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा हीच अपेक्षा असते मात्र, पुसद शहरातील या खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयाचे संचालक डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी ‘रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा’ म्हणी ला तडा दिलाआहे. आपल्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला रुग्णालयातील कंपाउंडरने नको त्या भागावर स्पर्श केल्याची घृणास्पद व संतापजनक घटना दि, १९ जुलैच्या रात्री समोर आली आहे.तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताप आल्याने तिच्या आई-वडिलांनी दि.१७ जुलै२०२५ रोजी पुसद शहरातील एका नामांकित खासगी क्रिष्णा बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलींची रक्त तपासणी करण्यास सांगितले रक्ताचे नमुने गोळा लॅबमध्ये पाठविले व रक्त तपासणीचा अहवाल आल्यानंतर तिला डेंग्यूच्या आजार झाल्याचे निदान झाल्याने रात्री १२:००वाजण्याच्या सुमारास तिला सलाईन लावले परंतु तिचा ताप कमी होत नसल्याने तिच्या डोक्यावर पट्ट्या लावून ताप कमी केला जात होता. दुसऱ्या दिवशी दि.१८जुलै रोजी त्या मुलीला जनरल कार्डमध्ये शिफ्ट करुन उपचार सुरू होता आई-वडील सुद्धा तिच्या सोबत होते. परंतु त्या मुलीचे वडील काही कामानिमित्त बाहेर निघून गेले परंतु सलाईन सुरू असताना रुग्ण मुलीच्या आईला अचानक डोळा लागला त्यावेळी आरोपी कंपाउंडर अचानक रुग्ण मुली जवळ येऊन व त्या मुलीची आई झोपली असल्याचे पाहून त्यांने रुग्णमुलीच्या नको त्या भागावर स्पर्श करून हे घृणास्पद व संतापजनक कृत्य केले. त्यावेळी आरोपीच्या स्पर्शाने अचानक रुग्ण मुलीला जाग आल्याने तीने आरडाओरड केली. त्यावेळी मुलीची आई तात्काळ झोपेतून जागी झाली व ही सर्व घटना रुग्ण मुलीने आईला सांगितलं त्यावेळी ही सर्व घटना मुलीच्या आई-वडिलांनी क्रिष्णा बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. तुषार पवार यांना सांगितले परंतु या डॉक्टरांनी आरोपीला कोणतीही समज दिली नाही उलट आरोपी हे घृणास्पद कृती करून रुग्णालयातच होता डॉक्टरांनी उलट हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रुग्ण मुलीच्या आई-वडिलांनी त्या मुलीला रुग्णालयातून घरी घेऊन जाऊ एवढे घृणास्पद कृत्य आरोपीने केले तरी डॉक्टर आरोपीला पाठीशी घालत असल्याने दि. २१ जुलै२०२५ रोजी पीडित मुलीच्या आई- वडिलांनी तात्काळ पुसद शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी तात्काळ सखोल चौकशी सुरु करीत या रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासून संबंधित रुग्णालयातील आरोपी कंपाउंडर समशेर उर्फ समीर प्रकाश आडे वय २१ रा. बोरनगर याच्यावर तसेच रुग्णालयाचे सर्वेसर्वा संचालक डॉ. तुषार उदेभान पवार वय ५५ वर्ष यांनी एवढी मोठ्ठी घृणास्पद कृत्य दडविल्या प्रकरणी त्यांच्यावरही भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यान्वये कलम १०, २१/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घृणास्पद कृत्य प्रकरणातील आरोपी सध्या फरार असुन त्याचा शोध पुसद शहर पोलीस घेत आहे. या घृणास्पद कृत्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.