सामाजिक

पुसद शहरात मेडिकल दुकानाचा परवाना कोणाचा, औषध विकणारा दुसराच;अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज!

पुसद : शहरात अनेक मोठ-मोठे खासगी रुग्णालय व मेटॅर्निटी होम आहेत. या खाजगी रुग्णालयाच्या व्यवसायामध्ये जणू काही डॉक्टरांची स्पर्धाच लागली आहे. या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिंवस वाढतच आहे. त्याच अनुषंगाने मेडिसिन औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून गल्लीबोळात चौका चौकात प्रत्येक खाजगी रुग्णालयात मेडिकल औषध विक्रीचे दुकाने अनेकांनी थाटली आहे. मात्र, या औषधी दुकानाचा मेडिकल परवाना एकाचा अन् औषध विकणारा दुसराच, असे अनेक दुकानांत धक्कादायक चित्र ‘झेप न्यूज’ च्या पाहणीत आढळून आले आहे मेडिकल दुकानात फार्मासिस्टशिवायऔषध-गोळ्याची विक्री करू नये असे औषध विभागाचे निर्देश असताना सुद्धा फार्मासिस्टशिवाय इतरांकडून औषध-गोळ्याची विक्री केली जात असल्याने हे किरकोळ औषध विक्रेते अन्न व औषध विभागांच्या नियमांच्या आदेशाची पायमल्ली सर्रासपणे करीत आहेत. परंतु याकडे अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून या विभागाने धृतराष्ट्राचे सोंग घेतले की काय.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा अवैधरित्या फार्मासिस्टशिवाय इतरांकडून औषध-गोळ्याची औषध विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहरात अनेक मोठ-मोठे खासगी रुग्णालय व मेटॅर्निटी होम आहेत. या खाजगी रुग्णालयाच्या व्यवसायामध्ये जणू काही डॉक्टरांची स्पर्धाच लागली आहे. या खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिंवस वाढतच आहे. त्याच अनुषंगाने मेडिसिन औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून गल्लीबोळात चौका चौकात प्रत्येक खाजगी रुग्णालयात मेडिकल औषध विक्रीचे दुकाने अनेकांनी थाटली आहे. तर एकीकडे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळतआहेत. तालुक्यात जवळपास १८४च्यावर खेडी असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरासह ग्रामीण भागात लहान मोठे अनेकजणं आजाराने ग्रासले आहे.माणसाची खरी संपत्ती म्हणजे, त्याचे आरोग्य आहे परंतु, सध्याची जीवनशैली आणि दिनक्रम तसेच हवामानाच्या परिस्थितीत अविश्वसनीय बदल यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शुगर, बीपी, हृदयरोग, मानसिक आजार यांसह अन्य आजाराने ग्रस्त असलेले अनेक लोक औषध घेतल्याशिवाय घराबाहेर पडतच नाहीत. अनेक लोक औषधांवर अवलंबून राहून काम करत असतात हे सत्य आहे.त्यामुळे अनेक किरकोळ मेडिकल दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहावयास मिळते त्यामुळे अनेकजण मेडिकल व्यवसायाकडे वळाल्याचे दिसून येतं आसल्याने शहरातील चौकाचौकात गल्लीबोळात मेडिकल दुकानांची संख्या वाढली आहे.या मेडिकल दुकानात फार्मासिस्ट शिवाय औषध-गोळ्यांची विक्री करू नये असे औषध विभागाचे निर्देश असताना सुद्धा हे किरकोळ औषध विक्रेते आपल्या मेडिकल दुकानात अन्न व औषध विभागाच्या नियमांच्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक मेडिकल दुकानांमध्ये परवाना धारकाऐवजी इतर मुले कामावर ठेवून फार्मासिस्ट शिवाय औषध- गोळ्यांची विक्री करीत आहेत. या किरकोळ औषध विक्रीची दुकानावर प्रत्येक औषधाचे रितसर बिल ग्राहकांना देणे बंधनकारक असताना सुद्धा बिल दिले जात नाही.अनेक मेडिकल दुकाने चुकीच्या पद्धतीने चालविण्यात येतात.परवाना एकाचा अन् चालवतंय दुसरचं त्यामुळे हे मेडिकल दुकानदार बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई करुन आपल्या तुंबड्या भरत आहेत मात्र दिवसाढवळ्या असे अनेक किरकोळ मेडिकल दुकानदारांनी बोगस व्यवसाय सुरु केला असताना सुद्धा कारवाईच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे, गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून या विभागाने धृतराष्ट्राचे सोंग घेतल्यामुळे अशा अवैध किरकोळ औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या दुकानाची सखोल चौकशी करून या अवैधरीत्या फार्मासिस्ट शिवाय औषध- गोळ्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close