श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय निवडणूक प्रक्रिया उत्साहात संपन्न
मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे -- प्राचार्य डॉ. गणेश पाटील

पुसद: स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी शालेय निवडणूक प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. निवडणूक प्रक्रियेचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. गणेश पाटील, रोटरी क्लब पुसदचे अध्यक्ष श्रीराम पद्मावार ,प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश रेवनवार, प्राचार्य रामचंद्र हिरवे उपस्थित होते. प्राचार्य गणेश पाटील यांनी फीत कापून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यास अनुमती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की शालेय जीवनात आपले राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ कसे निवडले जाते याचे प्रात्यक्षिक या शालेय निवडणुकीतून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
हा एक अत्यंत चांगला उपक्रम विद्यालयाने आयोजित केला.केल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले मतदान हा लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे तो त्यांनी बजावलाच पाहिजे असे उद्घाटन पर भाषणात त्यांनी आपले मत विशद केले. त्यानंतर श्रीराम पद्मावार व डॉ. उमेश रेवणवार यांनी मुलींमध्ये उद्भवणाऱ्या सर्वंकल कॅन्सर आजारा पासून सुरक्षितता कशी मिळवावी यासंदर्भात माहिती दिली सोबतच वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप रोटरी क्लब मोफत उपलब्ध करून देत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.शालेय विद्यार्थ्यांना निवडणुकीविषयी माहिती व कुतूहल निर्माण व्हावी या उद्देशाने संपूर्ण विद्यालयात निवडणुकीचे एकुण १४ बूथ तयार करण्यात आले या प्रत्येक बुथ वर विद्यार्थ्यांनी आपला गुप्त मतदानाचा हक्क बजावला व शालेय मंत्रिमंडळासाठी इच्छुक असलेल्या ५६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद करण्यात आले.
यावेळी मतदान प्रक्रियेला एनसीसी ऑफिसर विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा कडे कोड बंदोबस्त होता. राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रयत्न केले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सदर निवडणूक प्रक्रियेचे व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा गजानन जाधव यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.