खंडाळा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराविरुद्ध महिलांनी सुरू केलेले उपोषण अखेर नव्या दिवशी तात्पुरते स्थगित!
संबंधित ठाणेदाराविरुद्ध कारवाई न केल्यास किंवा आम्हाला न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या विरोधातील उपोषणास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यां महिलांनी तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु संबंधित ठाणेदारावर योग्य ती कारवाई नकेल्यास किंवा न्याय न मिळाल्यास पुन्हाआमरण उपोषण करण्याचा इशारा या उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुसद तालुक्यातील मांजर जवळा येथील अनिताबाई बन्सी कांबळे ह्या आपल्या शेती प्रकरणाच्या तक्रारी संदर्भात दि, २७ जून २०२५रोजी खंडाळा पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या.त्यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी या तक्रार करत्या महिलांचा तक्रारअर्ज घेण्यास नकार दिल्यामुळे या तक्रारकर्त्या महिलांनी संबंधित पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ठाणेदारांची तक्रार दाखल केली होती त्यामुळे ठाणेदारांनी चिडून जाऊन तक्रारकर्त्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत विना अण्णपाण्या वाचून व विना बाथरूमला सुद्धा जाऊन देता जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनमध्ये एकाच जागी बसून ठेवले तसेच एका पोलीस शिपाई कर्मचाऱ्यास आदेश दिले की या महिलेला दुचाकी वरून तहसील कार्यालयापर्यंत फरफटत घेऊन अशी जाणीवपूर्वक महिला तक्रार कर्त्यानां ठाणेदरांने हीन वागणूक दिल्यामुळे त्यावरून तक्रारकर्त्या महिला अनिताबाई कांबळे यांनी कोणताही गुन्हा नसताना अपमान कारक वागणूक दिल्याने तसेच अश्लिल भाषेत शिवी गाळ केल्याने संबंधित ठाणेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दि १ जूलै २०२५ पासून तहसील कार्यालय पुसद येथे आमरण उपोषणास सुरुवात केली होती त्यावेळी दि ९जूलै २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी कारवाईचे उपोषणकर्त्या महिलांना उपोषण मागे घेण्यासाठी लेखी पत्र देऊन सबंधित ठाणेदार विरुद्ध कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने माळ पठारावरील समाजसेवक शिलानंद कांबळे यांच्या मध्यस्थीमुळें शेवटी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु संबंधित ठाणेदाराविरुद्ध कारवाई न केल्यास किंवा न्याय न मिळाल्यास पुन्हा अमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारकर्त्या महिलांनी दिला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवेंद्र खडसे तसेच शिवसेनेच्या नेत्या मालती मिश्रा त्याचबरोबर ग्रा.प.सदस्या मीराबाई कान्हेकर अदि उपस्थीत होते.